Latest News

Supriya Sule on New Sansad Bhavan : राज्यसभा नाही का पार्लिअमेंटमध्ये? आम्ही पण गेलो असतो…वाचा सविस्तर

पुणे : आज नवी दिल्ली येथे पंतप्रधानांच्या हस्ते नवीन संसद भवनाच ( New Parliament Inauguration )उद्घाटन होत आहे. विरोधकांनी एकत्रितपणे या कार्यक्रमावर बहिष्कार टाकलेला आहे. खा. सुप्रिया सुळे यांना याबाबत विचारले असता त्यांनी सांगितलं की तीन दिवसाअगोदर मला कमिटी मेंबर असल्यामुळे एक व्हाट्सअपला निमंत्रणाचा मेसेज आला होता.

संसद भवन हे ट्रेझरी बेंच चालवतो एरवी इतर बिल संदर्भात ट्रेझरी बेंच विरोधकांना फोन करतो. सरकारमधील कोणत्या मोठया नेत्याने किंवा मंत्र्याने आम्हाला साधा फोन केला नाही, आम्ही पण गेलो असतो.

New Sansad Bhavan : खासदारांची आसन क्षमता माहिती आहे का?

माझ्यासाठी जुनी वास्तू ही अतिशय प्रिय आहे.जुनी वास्तू ही खरी माझ्यासाठी लोकशाहीचं मंदिरच राहणार आहे.

राज्यसभेचे अध्यक्ष हे उपराष्ट्रपती असतात आणि तेच या कार्यक्रमाला उपस्थित नाहीत, याचा अर्थ तुम्ही राज्यसभेला पूर्णपणे हद्दपार केल आहे. राज्यसभा नाही का पार्लिअमेंटमध्ये? असा प्रश्न त्यांनी सरकारला विचारला.

MNS Sachin Gole : माथाडी मंडळाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांकडून माथाडी टोळी युद्ध भडकवले जात आहे

संसद हे लोकशाहीचे मंदिर आहे. विरोधी पक्ष त्यांना सोयीनुसार बिल पास करण्यासाठी हवा असतो. सोयीनुसार विरोधी पक्ष असणे हे दुर्दैव आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button