परिवर्तन न्यूज- Exclusive

Pune Crime News : वाघोलीत भाजी चिरण्याच्या चाकूने प्रियकराची हत्या, धक्कादायक घटना

पुणे| वाघोली : पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रियसी कडूनच प्रियकराचा चाकूने वार करून खून झाल्याची घटना समोर आली . पुण्यातील वाघोली भागात हे प्रकरण घडले . आज सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे दोघेही काही महिन्यांपासून वाघोली या परिसरात भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होते. या दोघांमध्ये काही महिन्यांपासून प्रेमसंबंध देखील होते पण आज सकाळी अचानक घटना समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच लोणीकंद पोलिस घटनास्थळी झाले.

माहितीमधून हे देखील समोर आले आहे की प्रियसीने घरातील भाजी कापण्याचा चाकूनेच प्रियकरावरती वार केले. प्रियकराला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले पण पोहोचण्याआधीच प्रियकराचा मृत्यू झाला होता.

संबंधित प्रेयसी देखील जखमी झाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवला असून याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

UPSC IAS Toppers : शेतकऱ्याचा लेक झाला IAS

IPL 2023 Final CSK vs GT : कुणाला किती रक्कम मिळणार?

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button