परिवर्तन न्यूज- Exclusive

Sanjay Raut : त्या टोळीने 48 जागावर निवडणूक लढावावी ! कोणावर साधला निशाणा?

मुंबई : खा.संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत नवीन संसद भवन उदघाटन, शिंदे गट, पंतप्रधान यांवर जोरदार टिका केली.

संजय राऊत यांना शिंदे गटासंदर्भात विचारले असता त्यांनी मांडलेली भूमिका खालीलप्रमाणे :

1) शिंदे गट म्हणजे भारतीय जनता पक्षाने पाळलेला तो कोंबड्यांचा खुराडा आहे. शिंदे गटाकडे मी पक्ष म्हणून बघितलंच नाही. तो पक्ष नाहीच आहे.

2) गावात कोंबड्याचे खुराडे असतात आणी कधीही कोंबड्या कापले जातात. कोंबड्या ज्याप्रमाणे कॉक- कॉक करतात तसे ते करतायत. तो पक्ष नाहीच आहे.

3) शिंदे गटाकडे काय विचारधारा आहे? फक्त निवडणूक आयोगाने निर्णय विकत दिला म्हणून तो पक्ष होत नाही.

4) त्या टोळीने 48 जागा लढवाव्यात आम्हाला फरक पडत नाही. आमचा 19 खासदारांचा लोकसभेतील आकडा कायम राहील, यावर कोणी टिका केली तरी आम्हाला फरक पडत नाही.

5) शिंदे गटाला 22 काय यांना 5 जागा जरी मिळाल्या तरी भरपूर.

6)मी माझ्या पक्षाची भूमिका मांडतोय, उद्धव ठाकरेंची भूमिका मांडतोय.

खा. संजय राऊत यांनी शिंदे गटावर जोरदा केली आहे. यावर शिंदे गट काय भूमिका मांडणार याकडे लक्ष असणार.

Vilasrao Deshmukh Jayanti : जनतेसाठी नेहमी झटणार वक्तिमत्व !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button