Latest News

IPL 2023 Orange Cap : सलग 3 शतक ठोकत ऑरेंज कॅप आता Shubham Gill कडे.

GT vs MI Qualifier सामान्यातील शुभमन गिलच्या शतकाने मुंबई इंडियन्सचे फायनलच स्वप्न भंगल. शुभमन गिल ऑरेंज कॅपचा बनला नवा मानकरी.

अहमदाबाद | Gujarat Titans : काल अहमदाबाद मध्ये आयपीएलच्या 16वा हंगामातील दुसरा क्वालिफायर सामना खेळला गेला. या सामन्यामध्ये गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स अशी लढत झाली. आयपीएल मधील या सामन्याकडे जगातील क्रिकेटप्रेमी लक्ष देऊन होते. या सामन्यातील सर्वात मुख्य आकर्षण ठरलं ते शुभमन गिल यांनी केलेले शतक.गिल याने आयपीएलच्या या हंगामामध्ये तीन शतके ठोकले आहेत.

Shubham Gill

आयपीएलच्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात शुभमन गिले 129 धावांची उत्कृष्ट खेळी केली.आयपीएलच्या या मोसमात गिलने 16 डावात 60.79 च्या सरासरीने एकूण 851 धावा केल्या आहेत. IPL Qualifier मध्ये शतक ठोकणारा गिल आता 7 वा खेळाडू ठरला आहे.

प्रत्येक डॉट बॉलमागे आज झाड का दिसतंय? जाणून घ्या काय आहे कारण

या सामन्यापूर्वी शुभमन गिलने 15 डावात 55.54 च्या सरासरीने 722 धावा केल्या होत्या. या मॅच आधी गिल आणी डु प्लेसिस यांचा फक्त 8 धावांचा फरक होता. शतक ठोकत धावांचा नवीन विक्रम व ऑरेंज कॅप शुभमन गिलने मिळवली आहे.

रविवारी होणाऱ्या GT vs CSK Final सामन्यात देखील शुभमन गिलची ही खेळी बघायला मिळते का? याकडे लक्ष राहणार आहे.

मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), कॅमेरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, ख्रिस जॉर्डन, पीयूष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ, कुमार कार्तिकेय आणि आकाश मढवाल.

गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन | हार्दिक पांड्या (कर्णधार), वृद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, साई सुदर्शन, विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहित शर्मा, नूर अहमद आणि मोहम्मद शमी.

UPSC IAS Toppers : शेतकऱ्याचा लेक झाला IAS

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button