Latest News

Karnataka CM सिद्दरामय्या यांचा शपथविधी आजअखेर पार पडला !

कर्नाटक : आज दिवसभर चर्चा होती ती, कर्नाटकातील सिद्दरामय्या सरकारच्या शपथविधीची. या शपथविधीसाठी देशभरातील विविध काँग्रेसच्या मित्रपक्षाच्या प्रमुखांनी हजेरी लावली.

शपथविधी सोहळ्यात तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उप मुख्यमंत्री तेजस्वी यादव, जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती, फारुख अब्दुल्ला हे देखील उपस्थित होते.इतर विरोधी नेत्यांमध्ये शरद पवार, कमल हसन यांचा समावेश होता.

बेंगळुरू येथील कांतीराव स्टेडियमवर झालेल्या शपथविधी समारंभात राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी सिद्धरामय्या यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

यावेळी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह काँग्रेस पक्षाचे अनेक नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.

समारंभाच्या आधी, राहुल गांधी, शिवकुमार आणि सिद्धरामय्या या तिघांनी एकत्र येऊन शक्ती प्रदर्शन केले.तसेच डीके शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यासाठी अनेक दिवसांच्या चर्चेनंतर राष्ट्रीय राजधानीतून परतल्यानंतर सीएलपीची बैठक बेंगळुरू येथील पक्ष कार्यालयात झाली.

शिवकुमार यांनी सिद्धरामय्या यांची CLP नेता म्हणून निवड करण्याचा ठराव मांडला. त्यास सर्व सदस्यांनी एकमताने अनुमोदन दिले.

13 मे रोजी जाहीर झालेल्या निकालात 224 सदस्यीय कर्नाटक विधानसभेत काँग्रेसने 135 जागा जिंकल्या आणि भाजपला 66 जागांवर धक्का दिला.

Raj Thackeray : नोटबंदीतला धरसोडपणा परवडण्यासारखा नाही

2 हजाराच्या नोटबंदीवरून अजित पवार यांचा सवाल

एकंदरीत पाहता कर्नाटकातील सरकार हे विरोधकांसाठी लोकसभेसाठी एक नवीन ऊर्जा स्रोत बनले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button