Latest Newsपरिवर्तन न्यूज- Exclusiveमहाराष्ट्रशहर

Ajit Pawar News : साधा मुंबई अध्यक्ष ‘आपल्याला’ नेमता येत नाही ! अजितदांदाचा नेमका रोष कोणावर?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुंबईत कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात भाषण करताना अजित पवार यांनी पक्षाकडे महत्त्वाची मागणी केली. विशेष म्हणजे त्यांनी आपल्याला विरोधी पक्षनेते पदाच्या जबाबदारीतून मुक्त करा, असं अजित पवार म्हणाले.


तसेच आपल्याला 25 वर्षात एकहाती सत्ता का आणता आली नाही? यावर मुद्द्यावर त्यांनी सगळ्यांच लक्ष वेधलं व आपली भूमिका मांडली.

अजितदादांनी कार्यकर्त्यांचे टोचले कान !

यावेळी भाषण करताना अजित पवार यांनी कार्यकर्त्यांचे देखील कान टोचले. “आपण आपल्या एकट्याच्या ताकदीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यात सत्तेवर निवडून येऊ शकलेला नाहीय. यासाठी आपणच कुठेतरी कमी पडलो आहोत. आपण विदर्भामध्ये कमी पडतो. आपण मुंबईत कमी पडतो. मुंबईत आजदेखील काय अवस्था आहे? आपण 25 वर्षे पूर्ण करुन 26 व्या वर्षात पदार्पण केलंय. पण अजूनही मुंबईचा अध्यक्ष नाहीय. आपल्याला दिल्लीला कुणाला विचारायला जायचंय?”, असा सवाल त्यांनी केला.

“आपल्याला निर्णय तर महाराष्ट्रातच घ्यायचाय. इथे आपल्या राष्ट्रवादी भवनमध्ये घ्यायचा आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि इतर मान्यवरांशी चर्चा करायची आहे. काय आपण कमी पडलो? कशामुळे कमी पडलो? कोकणात, पश्चिम महाराष्ट्रात आपण वर्चस्व निर्माण केलं. उत्तर महाराष्ट्रातही आपण चांगलं यश मिळवलं. आपण आज आनंदाचा दिवस साजरा करत असताना थोडं पाठीमागे वळून आत्मचिंतन करण्याची गरज आहे”, असं मत अजित पवार यांनी मांडलं.

Ravindra Chavan on Eknath Shinde Government : शिवसेनेतल्या बंडाला वर्षपूर्ती, भाजपचा मोठा गौप्यस्फोट

अजित पवार यांनी यावेळी घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्याचे कान टोचले. तुझ्या वॉर्डात राष्ट्रवादीचा नगरसेवक आहे का? किंवा ग्रामपंचायत निवडणुकीत सत्ता मिळवली आहे का? असा प्रश्न अजित पवार यांनी केला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button