Dhananjay Munde : पुण्यातील ‘या’ स्टेडियमला शरद पवार यांचं नाव द्या, धनंजय मुंडे यांची मागणी

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडून एमपीएल 2023 अर्थात महाराष्ट्र प्रीमिअर लीग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. या स्पर्धेला 15 जूनपासून सुरुवात झालीय. या स्पर्धेतील अंतिम सामना हा 29 जूनला पार पडणार आहे.
एमपीएल (MPL) मधील सर्व सामन्याचे आयोजन हे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या पुणे येथील गहुंजे स्टेडियम मध्ये करण्यात आला आहे. याच स्पर्धेच अवचित साधून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री व आमदार धनंजय मुंडे यांनी आज एमसीएच्या अध्यक्षांकडे नवीन मागणी केली आहे.
आज धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार यांना पत्राद्वारे मागणी केली आहे. यात गहुंजे स्टेडियमला शरद पवार यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी केली आहे.
धनंजय मुंडे यांनी ट्विटरवरुन हे पत्र ट्विट केले आहे व ट्विट मध्ये पत्र व शरद पवार यांचा फोटो दिसत आहे.
आता या मागणीवर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन कडून काय निर्णय घेतला जातोय याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
दरम्यान MPL सामन्याला प्रेक्षकांडून चांगला प्रतिसाद मिळत आहे व या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.
50 कुठं 105 कुठं? हा आमच्या भाजपाचा मोठेपणा ! शिवसेना व भाजपामध्ये बॅनर्सवार?
Adipurush Movie Review : बहुचर्चित असलेला आदिपुरुष, पण प्रेक्षकांच्या अपेक्षेला कमी पडला