Latest News

Raj Thackeray letter to Narendra Modi : महिला कुस्तीपटूंच्या न्याय्य मागण्यांकडे लक्ष द्यावं

सध्या देशात चर्चा आहे ती आंदोलक कुस्तीपटूंची. त्यांची मागणी आहे की बृजभूषण सिंग यांना लैंगिक छळाच्या आरोपाखाली अटक करण्यात यावी. या मागणीसाठी गेली एक महिना झालं दिल्ली येथे आंदोलन सुरु आहे.

अनेक राजकीय पक्षांनी व नेत्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. केंद्र सरकारने लवकर कारवाई करावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून या विषयाकडे लक्ष द्यावं ही मागणी केली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रातून मांडलेले महत्वाचे मुद्दे :

  • ज्यांचा गौरव आपण ‘देश की बेटियाँ’ असा करत आलो आहोत आणि ज्यांच्या श्रमातून आपल्या देशाला कुस्तीच्या खेळात अनेक पदकं बघायला मिळाली आहेत, त्या महिला कुस्तीपटू गेले कित्येक दिवस त्यांच्या मागण्यासाठी दिल्लीत आक्रोश करत आहेत.
  • ‘प्रधानसेवक’ ह्या नात्याने आपण ह्या विषयाकडे लक्ष द्यावं ही विनंती.
  • रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी त्यांचा लैंगिक छळ केल्याची तक्रार आहे. अशा परिस्थितीत आपल्याला न्याय मिळावा, आणि ह्या लढाईत कोणाच्याही ‘बाहुबला’चं दडपण किंवा अडथळा येणार नाही इतकीच त्यांना खात्री सरकारकडून हवी आहे, म्हणजे अर्थात आपणाकडून हवी आहे.

11 महत्वाचे मंत्रिमंडळ निर्णय, शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा, वाचा सविस्तर

  • आपण गुजरातचे मुख्यमंत्री असताना उत्तराखंडमध्ये दुर्घटना घडली तेंव्हा असो की मुंबईतील २६/११ च्या घटनेच्या वेळेस धाव घेतली होतीत. ही तुमची सहृदयता होती आणि हीच सहृदयता तुम्ही तुमच्या कार्यालयापासून किंवा निवास्थानापासून अवघ्या काही किलोमीटवर असलेल्या महिला कुस्तीपटूंना दाखवावी ही जशी त्या महिला कुस्तीपटूंची आहे तशीच इच्छा / विनंती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पण आहे.
  • आपण खेळाडूंना देशाचा गौरव म्हणत असू तर मग त्यांची २८ मे ला ज्या पद्धतीने फरफट झाली तशी फरफट होणार नाही आणि त्यांचं म्हणणं ऐकून त्यांना आश्वस्त केलं जाईल इतकं तर आपण नक्कीच कराल ह्याची मला खात्री आहे.
  • त्यांना योग्य न्याय नाही मिळाला तर कुठल्या खेळाडूला स्वतःच्या रक्ताचं पाणी करून देशासाठी पदक मिळवावं असं वाटेल?

New Sansad Bhavan : खासदारांची आसन क्षमता माहिती आहे का?

आपण ह्या विषयांत लक्ष घालावं आणि ह्या विषयात तोडगा काढावा ही पुन्हा एकदा विनंती. पंतप्रधान नरेंद्र मोदी याकडे कधी लक्ष देतील याकडे सर्व लक्ष लागलेलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button