Latest Newsपरिवर्तन न्यूज- Exclusiveसत्ताकारण

Sharad Pawar on Bihar Meeting : 2024ची रणनीती ठरणार आहे काय? शरद पवार यांनी स्पष्ट सांगितलं

येणाऱ्या 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षांनी कंबर कसली आहे. याच पार्श्वभूमीवर बिहारमध्ये आज सर्व विरोधीपक्ष प्रमुख नेते एकवटणार आहेत.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीला काँग्रेसचे नेते राहुल गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे देखील उपस्थित राहणार आहेत. या बैठकीला जाण्यापूर्वी शरद पवारांनी एक विधान केले आहे. या विधानामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

या बैठकीमध्ये 2024 या निवडणुकांमध्ये भाजपाला कसं हरवायचं? विविध राज्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेऊन त्यात भाजपा विरुद्ध मजबूत उमेदवार कसा द्यायचा? किंवा या एकंदरीत परिस्थितीमध्ये भाजपाला हरवण्यासाठी कशा पद्धतीने रणनीती आखणी होणार असा अंदाज होता. पण शरद पवारांनी या सर्व चर्चा होणार नसल्याचे सांगितल आहे.

रणनीतीवर चर्चा नाहीच

शरद पवार हे आज पुण्यातील मोदीबागेतून पाटण्याकडे जायला निघाले. जाताना त्यांनी पाच मिनिटं मीडियाशी संवाद साधला. आजच्या बैठकीच्या स्वरुपावर त्यांनी भाष्य केलं. आजच्या बैठकीत 2024ची रणनीती ठरणार आहे काय? असा सवाल शरद पवार यांना विचारण्यात आलं असता, हे आज सांगता येणार नाही, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे आजच्या बैठकीत 2024च्या निवडणुकीच्या रणनीतीबाबत चर्चा होणार नसल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या विषयावर चर्चा होणार

आजच्या बैठकीत देशासमोरच्या महत्त्वाच्या प्रश्नावर चर्चा करणार आहोत. देशाच्या काही राज्यात मणिपूर वगैरे आदी ठिकाणी लोक रस्त्यावर उतरले आहेत. रस्त्यावरून आणि कायदा आणि सुव्यवस्था निर्माण केली जात आहे. ज्या राज्यात भाजपची सत्ता नाही, तिथेच हे प्रकार घडत आहेत. या मागे कोण आहे हे स्पष्ट होत आहे. हे देशाच्या दृष्टीने योग्य नाही. यावर एकत्रित विचार करून पुढची लाईन ठरवण्यात येणार आहे. तसेच इतर राज्यातील नेते काही मुद्दे उपस्थित करतील. पण ते आज सांगता येणार नाही, असं शरद पवार म्हणाले. काँग्रेस नेते या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे पाटण्यात दाखल, बिहारमधून ठरणार भाजपविरोधी रणनीती?; थोड्याच वेळात बैठक

उद्धव ठाकरे यांचा आजचा पाटणा दौरा

सकाळी 8 वाजता मुंबई विमानतळावरून खासगी विमानाने पाटण्याच्या दिशेने रवाना.

सकाळी 10 वाजता पाटणा येथे आगमन.

त्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट.

11 वाजता पाटणा येथे होणाऱ्या बैठकीला उपस्थिती.

पत्रकार परिषदेला संबोधण त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता खाजगी विमानाने मुंबईच्या दिशेने रवाना.

संध्याकाळी 7 वाजता मुंबई विमानतळावर आगमन.

Ajit Pawar News : साधा मुंबई अध्यक्ष ‘आपल्याला’ नेमता येत नाही ! अजितदांदाचा नेमका रोष कोणावर?

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button