Latest News

MPSC Result Komal Shinde: परिस्थितीवर मात करत MPSC मध्ये मिळवला 13 वा क्रमांक

पुणे: सध्या महाराष्ट्रात चर्चा आहे ती यूपीएससी आणि एमपीएससी मध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांची. अनेक विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून हे यश संपादन केले आहे आणि या यशाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

अशीच एक यशोगाथा सध्या समाज माध्यमांमध्ये चर्चेत आहे. ती आहे म्हणजे वाघोली, पुणे येथील कोमल शिंदे यांची. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत वाघोली येथील कोमल शिंदे यांनी 13 वा क्रमांक मिळवून उत्तीर्ण होण्याचा बहुमान मिळवला आहे.

दुसऱ्या प्रयत्नात तिने सहाय्यक राज्यकर आयुक्त हे पद मिळवले आहे, जे की अत्यंत गौरवास्पद बाब आहे. तिने मिळवलेल्या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

सध्या कोमल शिंदे ही पशुसंवर्धन मंत्रालयात कक्ष अधिकारी या पदावर कार्यरत आहे. वाघेश्वर स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून कबड्डी खेळात राष्ट्रीय स्तरावर नेत्रदीपक कामगिरी केली आहे.

कोमल शिंदे यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण वाघोली येथे झाले होते. गरीब परिस्थितीत वडिलांच्या मृत्यूनंतर आई नंदा शिंदे, भाऊ सुनील शिंदे, मामा नवनाथ सातव यांनी तिचे शिक्षण पूर्ण होण्यासाठी खूप परिश्रम घेतले.

कोमलची परिस्थिती हालाखीची असताना आई, भाऊ, मामा यांच्या पाठिंब्याच्या जोरावर दिवस-रात्र अभ्यास करून या पदापर्यंत पोहोचता आले असे तिने एका मुलाखतीमध्ये सांगितले.

अतिशय खडतर प्रवास करत ग्रामीण भागातून आलेली मुलगी फक्त जिद्दीच्या आणि मेहनतीच्या जोरावर कोणत्याही आधाराशिवाय आज राज्यसेवा पास करून समाजातील इतर मुलामुलींसाठी एक आदर्श म्हणून कामगिरी केली .

ज्या मुलीचं शिक्षण गावापासून सुरू झालं गावात परिस्थिती जेमतेम असताना त्या परिस्थितीची जाणीव आपल्या कष्ट करणारी आई आणि वडिलांचा अभाव अशा वाईट परिस्थितीवर मात करायची तिने ठरवली आणि तिने जिद्दीने हा प्रवास सुरु होता.

कर्तृत्ववान लोक परिस्थितीवर मात करून यशाकडे वाटचाल करतात. सर्वांच्या आशीर्वादाने आणि तिच्या मेहनतीने आज गावाचे नाव रोशन केलं .

UPSC IAS Toppers : शेतकऱ्याचा लेक झाला IAS

Youtube Channel कसे बनवायचे?

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button