Latest Newsपरिवर्तन न्यूज- Exclusiveमहाराष्ट्रशहरसत्ताकारण

KCR Maharashtra Daura : BRS पार्टी ही शेतकऱ्यांची टीम आहे ! भगीरथ भालके आमदार झाले तर मंत्रीही होतील

तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर (KCR Maharashtra Daura) हे दोन दिवसाच्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत.
आज मुख्यमंत्री केसीआर यांनी पंढरपुरात जाऊन पांडुरंगाचे दर्शन घेतलं . तसेच आज BRS पार्टी मध्ये दिवंगत आमदार भरत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके (Bhagirath Bhalke joined BRS Party) यांनी जाहीर प्रवेश केला.

या पक्ष प्रवेश सोहळ्याच्या कार्यक्रमामध्ये बोलताना मुख्यमंत्री केसीर यांनी सर्व पक्षातील नेत्यांना वरती टिका केली व काही थेट प्रश्न देखील त्यांना विचारले.

इतर पक्षांमध्ये भीतीचं वातावरण काय आहे? (KCR Maharashtra Daura)

आम्हाला महाराष्ट्रात येऊन चार महिने झाले इतर पक्षांमध्ये भीतीचं वातावरण काय आहे? कुणी आम्हाला बी-टीम म्हणतोय कुणी आम्हाला सि-टीम म्हणतोय. BRS पक्ष हा कोणाचीही टीम नाही आहे हा पक्ष शेतकऱ्यांची टीम आहे असे त्यांनी सगळ्यांना ठणकावून सांगितले.

उसाच्या दराबाबत कायमचा तोडगा काढू शकत नाही का?

महाराष्ट्र तर रोज आठ ते दहा शेतकरी आत्महत्या करतात.तेलंगणा मध्ये आम्ही शेतकऱ्यांना फिरण्यासाठी एकरी दहा हजार रुपये देतो. तसेच शेतकऱ्यांना 24 तास वीज उपलब्ध असते. महाराष्ट्रामध्ये दरवर्षी ऊस तोडणी उसाच्या दरासाठी संघर्ष होतो.पण सरकार या उसाच्या दराबाबत कायमचा तोडगा काढू शकत नाही का? असं केसीआर म्हणाले

Telangana CM KCR Maharashtra Tour : 600 गाड्यांचा ताफा घेऊन महाराष्ट्रात ! राजकारणावर काय होणार परिणाम? वाचा सविस्तर

भारतातील वीज नीती बदलली पाहिजे.

भारतात पाणी, वीज मुबलक आहे. भारतातील वीज नीती बदलली पाहिजे. पुढील 150 वर्षे पुरेल एवढा कोळसा भारतात आहे. मात्र आता ऑस्ट्रेलियातून कोळसा आयात केला जातो आहे. मात्र असं असताना खासगीकरण केले जात आहे. मंगळवेढ्यातील 35 गावांना पाणी दिले जात नाहीत. सोलापूर, पंढरपूर, अकोला यां शहरांत पाणी कमी दिलं जातं. मात्र भारतातील जलनितीला उचलून बंगालच्या खाडीत फेकलं पहिजे. आता नवीन जलनीतीची गरज आहे. मात्र केंद्र सरकार ते करत नाही, असंही ते म्हणालेत.

भगीरथ भालके आमदार झाले तर मंत्रीही होतील.

मी भगीरथ भालके यांना आश्वासन देतो की, मी त्यांना पूर्ण पाठिंबा देईल. आम्ही पूर्णपणे त्यांच्यासोबत आहोत. भगीरथ भालके आमदार झाले तर मंत्रीही होतील. ते निवडून विधानसभेत गेल्यावर पंढरपूरचा विकास होईल. भगीरथ युवा आहेत. त्यामुळे या भागाचा विकास करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत, असं केसीआर म्हणालेत.

एकंदरीत जर आज आपण मुख्यमंत्री केसीआर यांचे भाषण बघितलं तर त्यांनी पाणी, वीज,शेतजमीन, शेतकरी
या विषयावरती अभ्यासपूर्ण वक्तव्य केले व सर्व जनतेला देखील याबाबत विचार करण्यास सांगितले.

रोहिणी खडसेंना जळगाव पोलिसांनी घेतलं ताब्यात; एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button