Latest News

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर ऑइल टँकरला भीषण आग, दोघांचा मृत्यू!

Pune Mumbai Expressway : आज दुपारच्या सुमारास मुंबई-पुणे एक्सप्रेस वर मोठा अपघात झाला आहे. या अपघातानंतर दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे.

एक्सप्रेसवेला एका ऑईल टँकरला आग लागली आहे. या आगीमुळे चार जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती आहे. तसेच तीन जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

सध्या अग्निशमन दलाला आग विझवण्यात यश आले आहे. केमिकल टँकर पुलावर असताना लागलेल्या आगीमुळे पुलाखालून जाणाऱ्या गाड्यांचे देखील हानी झाली आहे.

भरधाव वेगाने निघालेल्या टँकरच्या चालकाचा ताबा सुटला आणि त्यामुळे टँकर स्लीप झाला. अपघातामुळे टँकर आडवा झाला आणि टँकर मधील केमिकल रस्त्यावर पसरले आणि काही केमिकल पुलावरून खाली काम करणाऱ्या व्यक्तींचा अंगावर पडले.

त्यानंतर टँकरला आग लागली आणि काम करणारे चार व्यक्ती देखील या आगीत होरपळले. महामार्गावरील खंडाळा घाटात अपघात झाला आहे. या आगीमुळे पुलाच्या खाली असलेल्या गाड्या देखील जळून खाक झाल्या आहेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरून अपघातात मृत्यू पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहिली आहे.

राज्य पोलिस दल, महामार्ग पोलिस, आयएनएस शिवाजी, अग्निशमन दल अशा सर्व यंत्रणा घटनास्थळी असून आता आग आटोक्यात आली आहे. एका बाजूने वाहतूक पूर्ववत करण्यात आली असून, दुसराही मार्ग लवकरच सुरू होईल.
राज्य सरकार स्थितीवर पूर्ण लक्ष ठेवून आहे.

Sanjay Raut on Eknath Shinde : जाहिरातीत बाळासाहेबांचा फोटो नाही? ये पब्लिक है…सब जानती है

RBI भरती 2023 : कनिष्ठ अभियंता 35 पदांसाठी ऑनलाइन अर्ज करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button