Latest Newsपरिवर्तन न्यूज- Exclusiveमहाराष्ट्रशहरसत्ताकारण

Ravindra Chavan on Eknath Shinde Government : शिवसेनेतल्या बंडाला वर्षपूर्ती, भाजपचा मोठा गौप्यस्फोट

महाराष्ट्रात शिवसेनेतल्या एकनाथ शिंदे यांच्या बंडाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. काल मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये या बंडाबाबत काही मोठे गौप्यस्फोट केले आहेत. ऑपरेशन लोटस मोहीमेत रविंद्र चव्हाण यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती.

महाराष्ट्रात यापूर्वी 2019 आणि 2021 मध्ये ऑपरेशन लोटस झाले होते पण ते अयशस्वी ठरले. दिलेल्या मुलाखतीत रवींद्र चव्हाण यांनी अनेक गुपिते उघड केली ते म्हणाले की दिल्लीतील नेत्यांनी महाराष्ट्रात अशा पद्धतीने ऑपरेशन लोटसचे ते तीन वेळा प्रयत्न केले. 2019 मध्ये एकनाथ शिंदे आणि शिवसेनेतील काही आमदार यांना एकत्र करून उठावाचे नियोजन झाले होते पण तांत्रिक कारणामुळे तो प्रयत्न होता अयशस्वी ठरला. नंतर कोरोना आला.2021 मध्ये प्रयत्न झाला पण वरिष्ठांनी हिरवा कंदील न दिल्यामुळे तो प्रयत्न देखील थांबला. शेवटी 2022 च्या जून महिन्यामध्ये हा प्रयत्न झाला आणी तो यशस्वी ठरला.

Maharahstra Monsoon Update : या दिवशी येणार मान्सून ! हवामान केंद्राने दिली मान्सूनच्या आगमनाची सखोल माहिती

या प्रयत्नात केलेल्या नियोजनाबाबत त्यांनी काही गोष्टींना देखील उजाळा दिला आहे. आधीपासूनच 40 आमदार सोबत होते पण जे काही घडलं ते दिल्ली पातळीवरून घडलं आणि त्यांचे मार्गदर्शक देवेंद्र फडणवीस होते.

ऑपरेशन लोटस बाबत संपूर्ण माहिती असलेले फक्त एक दोन व्यक्ती होते. बाकी अनेकांना केवळ जबाबदारीची माहिती दिली होती. म्हणजेच आमदारांना देखील माहीत नव्हतं की त्यांची गाडी कोण चालवतय ड्रायव्हरला देखील माहीत नव्हतं की आपल्या गाडीत कोण बसले.

सुरतला गेल्यानंतर आमदारांकडून मोबाईल फोन काढून घेतले तर टीव्हीही पाहू नव्हता दिला. तसेच कोणाशीही संपर्क साधण्याची त्यांना परवानगी दिली नव्हती. कारण या ऑपरेशनमध्ये काही चुक झाली असती तर देश पातळीवर ती भाजपाची नाचक्की झाली असती.

त्यात सुरत व गुहाटीतील मुक्काम हेदेखील अविस्मरणीय अनुभव होता असा रवींद्र चव्हाण यांनी सांगितलं कारण कोणीही निघून जाऊ नये याकरता पूर्ण खबरदारी घेतली होती. तसेच राजकीय घडामोडींमुळे दबाव होता. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांना देखील या मोहिमेची माहिती माहिती दिली नव्हती.

Nashik Jagannath Puri Rath Yatra 2023 : जगन्नाथ पुरीच्या धर्तीवर नाशिकमध्ये पहिल्यांदाच जगन्नाथ रथयात्रेचे आयोजन

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button