परिवर्तन न्यूज- Exclusive

Mumbai Trans Harbour Link : देशातील सर्वात लांब पूल, जाणून घ्या संपूर्ण माहिती

मुंबई : मुंबईत लवकरच ट्रान्स हार्बर लिंक सुरू होणार आहे. या पुलाच जवळपास नव्वद टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईसाठी हा प्रोजेक्ट हा प्रकल्प अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.कारण मुंबई, नवी मुंबई, रायगड या भागांना जोडण्यासाठी ट्रान्स हार्बर लिंकचा महत्त्वपूर्ण असा वाटा असणार आहे.

या वर्षात नोव्हेंबर पर्यंत हा पूल सुरू केला जाईल अशी माहिती आहे.

मुंबई ट्रान्स हार्बर लिंकची काय आहेत वैशिष्ट्य?

1)शिवडी ते न्हावा 22 किमी लांबीचा 6 पदरी पूल.

2) दक्षिण मुंबईला रायगडशी जोडणारी अखंड व थेट कनेक्टिव्हिटी. यामुळे मुंबई व नवी मुंबई, रायगड, मुंबई-पुणे-द्रूतगती महामार्ग व मुंबई गोवा महामार्ग यामधील अंतर कमी होणार

3) जगातील 10 व्या क्रमांकाचा व भारतातील सर्वाधिक लांबीचा समुद्र सेतू

4) ऑर्थोट्रॉपीक स्टील डेक तंत्रज्ञानाचा भारतात प्रथमच वापर

5) 17 आयफेल टॉवरच्या वजनाइतक्या म्हणजे 1,70,000 मे. टन स्टीलच्या सळयांचा वापर

6) पृथ्वीच्या व्यासाच्या 4 पट म्हणजे 48,000 कि. मी लांबीच्या प्रिस्ट्रेसींग वायर्सचा वापर

7) ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’साठी वापरण्यात आलेल्या काँक्रीटच्या सहा पट म्हणजे 9,75,000 घनमीटर काँक्रीटचा वापर

8) ‘बुर्ज खलिफा’च्या 35 पट उंचीच्या म्हणजेच सुमारे 35 किमी लांबीच्या पाईल लाईनर्सचा प्रकल्पात वापर.

9) इंधन, वाहतूक खर्च व वेळेत 1 तासाची बचत होणार.

10) ओपन रोड टोलिंग सिस्टिम असलेला देशातला पहिलाच प्रकल्प.

एकंदरीतच देशातील सर्वात लांब पूल हा मुंबईसाठी वरदान ठरणार आहे.

Sanjay Raut : त्या टोळीने 48 जागावर निवडणूक लढावावी ! कोणावर साधला निशाणा?

Vilasrao Deshmukh : जनतेसाठी नेहमी झटणार व्यक्तिमत्व !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button