परिवर्तन न्यूज- Exclusive

Nashik Jagannath Puri Rath Yatra 2023 : जगन्नाथ पुरीच्या धर्तीवर नाशिकमध्ये पहिल्यांदाच जगन्नाथ रथयात्रेचे आयोजन

जुन्या आडगाव नाक्यावरील पंचमुखी हनुमान मंदिर ट्रस्टच्या जिर्णोद्धारानंतर मंदिरात भगवान जगन्नाथ, बलभद्र व सुभद्रा यांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेच्या पार्श्‍वभूमीवर यंदापासून नाशिकमध्येही भव्य रथयात्रा काढण्याची घोषणा करण्यात आली होती. ओडिसा येथील जगन्नाथ पुरीच्या धर्तीवर नाशिकमध्ये पहिल्यांदाच जगन्नाथ रथयात्रेचे आयोजन आज करण्यात आलं आहे.

भाविकांना रथ ओढण्याची संधी

जगन्नाथ पुरीच्या रथोत्सवात रथ ओढल्यास सर्व पापांचा नाश होऊन जगन्नाथाचे आशिर्वाद मिळतात, अशी आख्यायिका आहे. मात्र त्यासाठी ओडिशा राज्यात जाणे अनेक भाविकांना शक्य नसते. त्याचाच विचार करून नाशिकमध्ये यंदापासून रथोत्सव साजरा करण्यात येणार असल्याचे श्री. भक्तीचरणदास यांनी सांगितले.

असा असेल रथ

  • उंची- १४ फूट
  • लांबी- १२ फूट
  • रुंदी- ६ फुट.

निर्मितीसाठी : सागवान लाकूड व लोखंडाचा वापर

जगन्नाथ यात्रेविषयी संपुर्ण माहिती जाणून घेऊया.

भारतातील प्रसिद्ध जगन्नाथ पुरी येथील रथ यात्रा 20 जून रोजी निघणार आहे. भारतातील ओडिशातील जगन्नाथ धाम हे जगप्रसिद्ध आहे. जगन्नाथ मंदिर ओडिशा के पुरी शहरात स्थित आहे. आषाढ़ महिन्यात तीन किलोमीटरची रथ यात्रा निघते.

पुरी शहरामध्ये लाखों भाविक आले आहेत. हे वैष्णव मंदिर श्रीहरी अवतार श्रीकृष्णचा आदर्श आहे.

Gruha Lakshmi Scheme Karnataka : महिलांना मिळणार दरमहा 2000 रुपयांची आर्थिक मदत ! पात्रता, नोंदणी, फायदे जाणून घ्या

जगन्नाथ रथ यात्रेचे महत्व :

हिंदू धर्मानुसार, आषाढ शुक्ल पक्षाची दुसरी तारीख भगवान जगन्नाथ, भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा हे मावशीच्या घरी जातात. जगन्नाथ मंदिरातून तीन भव्य रथांमधून ही भव्य यात्रा निघते. सर्वात पुढे बलभद्र यांचा रथ, त्यांच्या मागे बहीण सुभद्रा आणि सर्वात पुढे भगवान जगन्नाथ यांचा रथ असतो.

रथयात्रा का काढली जाते?

पद्म पुराणानुसार भगवान जगन्नाथाच्या बहिणीने एकदा हे शहर पाहण्याची इच्छा व्यक्त केली होती. तेव्हा जगन्नाथ आणि बलभद्र यांनी त्यांची प्रिय बहीण सुभद्रा यांना नगर दाखवण्यासाठी रथावर सोडले. यादरम्यान तो गुंडीचा येथे मावशीच्या घरीही गेला आणि येथे सात दिवस राहिला. तेव्हापासून जगन्नाथ यात्रा काढण्याची परंपरा सुरू आहे. नारद पुराण आणि ब्रह्म पुराणातही याचा उल्लेख आहे.

Chitra Wagh : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भाजपातर्फे राज्यभर विशेष कार्यक्रम !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button