परिवर्तन न्यूज- Exclusive

Arvind Kejriwal meet Sharad Pawar : राज्यसभेत जर अध्यादेशाविरोधात मतदान झाले तर देशाला याचा फायदा होईल

Arvind Kejriwal – Sharad Pawar Meet :

सध्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत.काल अरविंद केजरीवाल व पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी शिवसेना ( उद्धव बाळासाहेब यांची गट ) प्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली.

आज केजरीवाल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. खा. शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते, पंजाबचे मुखमंत्री श्री. भगवंत मान, आम आदमी पक्षाचे इतर नेते सुद्धा उपस्थित होते.

राजधानी दिल्लीचे प्रशासकीय अधिकार सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या हातात दिले होते. केंद्र सरकारने एक अध्यादेश काढून सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाला फाटा फोडला आहे. एक प्रकारे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिले आहे. केंद्र सरकारच्या या अध्यादेशाविरोधात राज्यसभेत एकत्र येण्याच्या दृष्टीने केजरीवाल प्रयत्न करत आहे. तीच चर्चा आज बैठकीत झाली.

केजरीवाल म्हणाले दिल्लीकरांवर मोठा अन्याय झाला आहे. राज्यसभेत जर अध्यादेशाविरोधात मतदान झाले तर देशाला याचा फायदा होईल. हा मुद्दा पक्षाचा नाही तर देशाचा बनलेला आहे.

शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट सांगितलं की हा मुद्दा फक्त दिल्लीचा आहे अस आम्ही मानत नाही. महाराष्ट्रातील जनता आणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अरविंद केजरीवाल यांच्या पाठीशी आहे अस पवारांनी आज जाहीर केले.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उद्धव ठाकरेंच्या भेटीला | Mumbai

 Jitendra Awhad : सुप्रीम कोर्टाचा सत्तासंघर्षाचा निकाल कोणाच्या बाजूने? 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button