परिवर्तन न्यूज- Exclusive

Sanjay Raut on Narendra Modi : LIC, Air India का विकावं लागल?

शिवसेना (उबाठा ) गटाचे खा. संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेऊन नरेंद्र मोदी व तसेच भाजपा वर जोरदार हल्ला चढवला आहे.

खा. संजय राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेतील मुद्दे खालील प्रमाणे आहेत :

  • सरकारला नऊ वर्ष झाली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्रकार परिषद घेऊन नऊ वर्षात काय दिल आहे, याबद्दल त्यांनी जनतेला सांगाव. लोकांना प्रश्न विचारू द्या.
  • जसे की राहुल गांधी आता परदेशात गेले आहेत परदेशात जाऊन राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली. या देशातील प्रत्येक नेता हा पत्रकारांशी बोलतो. उद्धव ठाकरे बोलतात, शरद पवार बोलतात, ममता बॅनर्जी बोलतात, मल्लिकार्जून खरगे देखील बोलतात. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी “मन की बात” बोलतात पण लोकांच्या मनातील प्रश्नांना ते का उत्तर देत नाही? असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला.

11 महत्वाचे मंत्रिमंडळ निर्णय, शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा, वाचा सविस्तर

  • आम्ही त्यांना अनेक प्रश्न विचारले. दहशतवाद कमी केला तर मणिपूर मध्ये सध्या काय चालू आहे?
  • अर्थव्यवस्था मजबूत आहे तर दोन वेळा नोट बंदी करून ती का फसली?
  • डॉलरच्या तुलनेत मध्ये रुपया इतका महाग का झाला. रुपया आज 80 पर्यंत पोहोचला आहे.
  • देशाची अर्थव्यवस्था एकाच उद्योगपतीच्या हाती दिल्यामुळे देशाचे किती नुकसान झाले.
  • LIC, Air India का विकावं लागल? कोणासाठी विकताय?

ठीक 7 वर्षानांनतर पुन्हा नोटबंदी ? 2000 रुपयाची नोट बंद ? वाचा सविस्तर

ह्या गोष्टी बाहेर येतीलच लवकर.

आमची प्रामाणिक इच्छा आहे की देशाच्या पंतप्रधानांनी एकदा पत्रकार परिषद घेऊन जनतेच्या मनातील सर्व प्रश्नांना उत्तरे द्यावीत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button