परिवर्तन न्यूज- Exclusive

Sharad Pawar on New Parliament Building : मला निमंत्रण नाही, वाचा सविस्तर

आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संसदेच्या नव्या इमारतीच उद्घाटन होत आहे. विरोधी पक्षांनी एकत्रितपणे या उद्घाटन सोहळयावरती बहिष्कार टाकलेला आहे.

आज पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया देताना असे म्हटले आहे की स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच आधुनिक भारताच स्वप्नं कुठेतरी मागे पडताना दिसत आहे.

नेहरूंचे विचार मागे पडत आहेत

हा सगळा सोहळा पाहिल्यानंतर असं वाटलं की पुन्हा एकदा आपण देशाला काही वर्ष पाठीमागे नेतो की काय अशी चिंता वाटू लागली आहे. नेहरूंचे विचार हे आधुनिक विज्ञानावर आधारित होते.

उपराष्ट्रपती उपस्थित नव्हते

आजच्या सोहळ्यामध्ये लोकसभेचे अध्यक्ष दिसले त्याबाबत आनंदच आहे. पण राज्यसभेचे प्रमुख उपराष्ट्रपती असतात ते आज कुठेच दिसले नाहीत. त्यामुळे हा सोहळा कदाचित मर्यादित लोकांसाठी होता की काय अशी शंका आहे, अशी टीका शरद पवार यांनी यावेळी केली

जुन्या संसदेशी आस्था

आमची आस्था ही जुन्या संसदेशी असणार आहे असं पवारांनी या ठिकाणी सांगितलं. जुन्या संसदेच महत्व प्रयत्न कुठेतरी कमी केल जात की काय अशी शंका आहे असे ते म्हणाले.

आम्हाला सांगितलं नाही

ठीक आहे निर्णय घेतला. राबवला पण आम्हाला सांगितलं नाही इतकी मोठी गोष्ट करताना त्यांनी सर्वांना विचारात घ्यायला हवं होतो असेही ते म्हणाले.

Supriya Sule on New Sansad Bhavan : आम्ही कर्यक्रमाला गेलो असतो, पण आम्हाला साधा फोन आला नाही

मला निमंत्रण नाही

विरोधी पक्षातील नेत्यांना निमंत्रण दिलं आहे का नाही मला माहीत नाही माझ्या हातात तर निमंत्रण आलं नाही पण कदाचित माझ्या जिल्ह्यातील निवासस्थानात पत्र आलेला असू शकतो मला माहीत नाही.

New Sansad Bhavan : खासदारांची आसन क्षमता माहिती आहे का?

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button