परिवर्तन न्यूज- Exclusiveमहाराष्ट्र

Vilasrao Deshmukh : जनतेसाठी नेहमी झटणार व्यक्तिमत्व !

लातूर : आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री स्व.विलासराव देशमुख यांचा वाढदिवस आहे. महाराष्ट्रातील राजकारणातील अजातशत्रू वक्तिमत्व अशी त्यांची ओळख होती.

संयमी स्वभाव, उत्तम प्रशासकीय कौशल्य, राजकीय परिपक्वता या जोरावर विलासराव देशमुखांनी महाराष्ट्रातच नव्हे तर केंद्रामध्ये देखील त्यांनी आपला ठसा उमटवला होता.

विलासरावांनी महाराष्ट्रासाठी तसेच लातूरसाठी केलेले काम जनता आज देखील विसरलेली नाहीये. लातूरच्या जनतेचा विलासरावांवर अगदी विलक्षण असं प्रेम आहे.

काँग्रेसमध्ये राहून आणि मुख्यमंत्री पदावर असून सुद्धा त्यांनी कधीच आपली प्रतिमा मलिन होऊ दिली नाही.

बाभळगावच्या सरपंचपदापासून सुरू झालेला प्रवास केंद्रीय अवजड उद्योगमंत्री म्हणून येऊन ठेपला होता. विलासरावांनी महाराष्ट्राचे दोन वेळा मुख्यमंत्रीपद भूषविले होते. वसंतराव नाईक यांच्यानंतर सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावर राहणारे विलासराव हे दुसरे मुख्यमंत्री होते.

आपल्या कारकिर्दीत विलासरावांनी राज्याच्या विकासाला गती देण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. महाराष्ट्र सहकार वित्त व विकास मंडळ, अल्पसंख्याक विकास मंडळाची स्थापना त्यांच्या काळात झाली होती. राज्यात गुटखा तसेच, डान्सबार बंदी सारखा महत्त्वाकांक्षी निर्णय त्यांनी घेतला होता

विलासराव देशमुख हे राज्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान असताना त्यांनी सूड भावनेने कधीच राजकारण केले नाही. आजही जेव्हा विलासराव देशमुख यांच्या नावाचा विषय असतो तेव्हा विरोधकांची भूमिका देखील नरमाईची असते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button