ST New Hirkani Bus : एसटीची नवीन हिरकणी, लूक बघितलात का? जाणून घ्या वैशिष्ट्ये

पुणे : सध्या चर्चा आहे ती एसटीने नव्याने बांधलेल्या “नवीन हिरकणी” बसची. या बसची बांधणी आणी उपयुक्तता अधिक चांगली आहे.
जुनी हिरकणी आपणा सर्वांना माहिती आहे ती म्हणजे हिरवा – पांढरा कलरमधील. आणी नवीन हिरकणी ही गुलाबी – पांढरा या कलरमध्ये बनवण्यात आली आहे.
नव्या हिरकणी बसचे काही महत्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे :
1) मध्यवर्ती कार्यशाळा दापोडी येथे या बसेसची निर्मिती करण्यात येत आहे.
२) बसच्या पाठीमागील चाकाला एअर सस्पेन्शन असून, प्रवासादरम्यान जास्त आदळ आपट होत नाही.

3) सुरुवातीच्या काही बसेसना प्रवासी दरवाजा हा साध्या बसप्रमाणे बाहेर उघडणारा लावण्यात आलेला असून,पुढील गाड्यांना प्रोटोटाईप हिरकणीप्रमाणेच आतमध्ये उघड झाप होणारा दरवाजाच लावण्यात येणार असल्याचे समजते.
4) बसच्या आतमध्ये पूर्वीची रंगसंगती बदलून, गडद चॉकलेटी, लाईट चॉकलेटी अशी आकर्षक रंगसंगती करण्यात आलेली आहे.
5) बसचे छत, सामान ठेवण्याची जागा आणि सीट्स यामध्ये जागा व कलर यांची चांगली सांगड घातली आहे.
6) USB मोबाईल चार्जिंगची सुविधा देखील देण्यात आलेली आहे.

7) आपत्कालीन परिस्थितीसाठी बसमध्ये हातोडी, अग्निशमन यंत्र, पाठीमागे आपत्कालीन दरवाजा याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
8) गाडीतील सर्व आसने (पाठीमागील ५ आसनासहित) पुशबॅक असून, आसनाच्या पाठीमागे, पाणी बॉटल होल्डर, बॅग हुक आणिमॅगझिन पाऊचची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
9) वाहकाच्या आसन व्यवस्थे जवळच तिकीट मशीन चार्जिंगची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे.
Pune Crime News : वाघोलीत भाजी चिरण्याच्या चाकूने प्रियकराची हत्या, धक्कादायक घटना
हिरकणी बस ही निमआराम श्रेणीतील उत्तमरित्या बांधण्यात आलेली असून, येणाऱ्या काळात आपल्या प्रतिक्रिया याबाबत जरुर कळवाल.