परिवर्तन न्यूज- Exclusive

बॉम्बे हॉस्पिटल मध्ये भारतीय कामगार सेनेला शिवसेनेच्या राष्ट्रीय कर्मचारी सेनेचा जोरदार दणका !

मुंबई : उबाठा गटाच्या निष्क्रियतेला कंटाळून भारतीय कामगार सेनेचे बॉम्बे हॉस्पिटल चे बहुसंख्य कामगार शिवसेनेच्या राष्ट्रीय कर्मचारी सेनेच्या झेंड्याखाली जाहीररित्या दाखल झाले.

शिवसेनेचे मुख्य नेते व मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली; राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष व मा. आमदार किरण पावसकर यांच्या नेतृत्वाखाली बॉम्बे हॉस्पिटलच्या बहुसंख्य कामगारांनी उबाठा गटाच्या भारतीय कामगार सेनेच्या कामगारविरोधी कार्यप्रणाली आणि निष्क्रिय धोरणाला कंटाळून राष्ट्रीय कर्मचारी सेनेच्या भगव्या झेंड्याखाली ज़ाहिर प्रवेश केला.

बॉम्बे हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाकडे अध्यक्ष किरण पावसकर यांनी सामोपचाराने चर्चा करून सुद्धा हॉस्पिटल व्यवस्थापनाने आडमुठेपणाची भूमिका घेतल्याने युनियन ने उद्यापासून रुग्णसेवेला कुठलाही अडथळा न करता व्यवस्थापन जोपर्यंत सामंजस्याची बोलणी करत नाही तोपर्यंत निषेध म्हणून काळ्या फिती लावून योग्य त्या पद्धतीत काम करण्याची भूमिका घेतलेली आहे तसेच माननीय मुख्यमंत्री तसेच आरोग्य मंत्री व संबंधित विभागीकडे पुढील काही दिवसांत कामगारांना न्याय देण्यासाठी युनियन चे अध्यक्ष कायदेशीर रितीने दाद
आहेत.

याप्रसंगी युनियन चे उपाध्यक्ष दिनेश शिंदे, कुणाल सरमळकर, श्रेयस पाडावे तसेच सहाशे पेक्षा जास्त कामगार तसेच शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

उद्धवजींचे पगारी कामगार कोण?

Jayant Patil Breaking | ILFS सोबत माझा काही संबंध नाही

Jayant Patil on ED Inquiry | NCP | Parivartan News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button