परिवर्तन न्यूज- Exclusive

Sharad Pawar Threat Case : शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी, “तुझा लवकरच दाभोळकर होणार” वाचा सविस्तर

मुंबई: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी सोशल मीडियावरून देण्यात आली आहे. ट्विटरवरून अज्ञात व्यक्तीने शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते याचा निषेध करत आहेत.

या प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तातडीने या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. सुप्रिया सुळे यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त यांच्याशी भेटून या प्रकरणाबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

सौरभ पिंपळकर या व्यक्तीच्या ट्विटरवरून शरद पवार यांना ही धमकी देण्यात आली आहे. राजकारण महाराष्ट्राचे या फेसबुक पेज वरून देखील शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे त्यावर नर्मदाबाई पटवर्धन असं नाव आहे.”तुझा लवकरच दाभोळकर होणार” अश्या शब्दांमध्ये पवारांना ही धमकी फेसबुक वरून देण्यात आली आहे.

सुप्रिया सुळे यांनी देखील प्रतिक्रिया वक्त केली आहे, “जर शरद पवारांना काही झालं तर याला केंद्र व राज्य सरकारचं गृहखात जबाबदार असेल.”

Padmasinha Patil : धारशिव जिल्ह्याची पाण्याची तहान भागवणार नेतृत्व ! वाचा सविस्तर

UPSC IAS Toppers : शेतकऱ्याचा लेक झाला IAS

Sharad Pawar Threat Case Latest News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button