परिवर्तन न्यूज- Exclusive

Sanjay Raut on Eknath Shinde : जाहिरातीत बाळासाहेबांचा फोटो नाही? ये पब्लिक है…सब जानती है

सध्या चर्चा आहे ती शिवसेनेच्या जाहिराती बाबत. आज सकाळपासून माध्यमांमध्ये शिवसेनेच्या एका जाहिरातीचा फोटो वायरल होतोय.

या फोटोमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोघे दिसत आहेत. यावरूनच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी घणाघाती टीका केली आहे.

राज्यात उत्कृष्ट मुख्यमंत्री कोण?

राज्यात उत्कृष्ट मुख्यमंत्री कोण? यासंदर्भात एक सर्वेक्षण झाले. त्या सर्वेक्षणाची जाहिरात शिवसेनेकडून वृत्तपत्रांमध्ये करण्यात आली आहे. या जाहिरातीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून पसंती दिली आहे.

या जाहिरातीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे यांचे फोटो वापरला आहे. त्याशिवाय या जाहिरातीत कोणाचाही फोटो नाही. शिवसेनेकडून ही जाहिरात दिली असताना त्यात बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो का नाही? असा प्रश्न शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

खा संजय राऊत यांनी ट्विटवर देखील याबाबत मत मांडले आहे :

  • कोट्यावधी रुपये खर्च करून केलेली ही जाहिरातबाजी. या आनंदाच्या क्षणी मा.मू. एकनाथ शिंदे यांना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा नेमका विसर पडलाय.
  • आम्हीच शिवसेना हा त्यांचा फुगा फुटला. जाहिरातीत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो टाकायला यांची तंतरली.
  • मोदी शहांचे इतके भय? बाकी ते सर्व्हे.. फडणविस हे तुमचे चघळायचे विषय
  • बाळासाहेबांचा फोटो टाकायला तंतरली हे मान्य करा..ये पब्लिक हैं..सब जानती है.

Rohit Pawar Latest : आ. राम शिंदे यांना ट्विटरवरून निमंत्रण? कशासाठी? वाचा सविस्तर

NHM अहमदनगर स्टाफ नर्स, समुपदेशक आणि इतर भरती 2023 – 209 पदांसाठी अर्ज करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button