परिवर्तन न्यूज- Exclusive

Rohit Pawar Latest : आ. राम शिंदे यांना ट्विटरवरून निमंत्रण? कशासाठी? वाचा सविस्तर

कर्जत : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार व भाजपाचे माजी मंत्री, आमदार राम शिंदे यांच्यातील वाक् युद्ध हे नेहमी चर्चेत असत. इतक्यातच आमदार रोहित पवार यांनी ट्विटरवरून आमदार राम शिंदे यांना थेट निमंत्रणच पाठवल आहे.

कर्जत मध्ये रोहित पवारांनी नवीन घर व ऑफिस बांधला आहे. कर्जत मध्ये बांधलेल्या “दिनकर” या निवासस्थानाची उद्या मंगळवार,13 जून 2023 रोजी पूजा ठेवण्यात आली आहे. या पूजेच्या निमित्ताने रोहित पवारांनी हे ट्विट करून निमंत्रण दिल आहे. रोहित पवारांनी भाजपा खा. सुजय विखे पाटील व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना देखील ट्विटरवरून निमंत्रण दिल आहे.

निवासस्थानाचे नाव “दिनकर” ठेवले आहे आणी त्याबाबत स्पष्टीकरण देखील दिल आहे. अर्थात सूर्य म्हणजेच अक्षय्य ऊर्जेचा महाप्रचंड स्त्रोत ! सूर्याप्रमाणेच कर्जत-जामखेडमध्येही मोठी क्षमता असून इथली माणसंही सूर्यासारखी तेजस्वी आणि अखंड कार्यरत राहणारी आहेत. म्हणूनच कर्जतमध्ये नव्याने बांधलेल्या निवासस्थानाचं नामकरण ‘दिनकर’ असं करण्यात आलंय.

Kiran Pawaskar Latest : कामगार नेते किरण पावसकर एअर इंडिया एम्लॉईज युनियनच्या अध्यक्षपदी विराजमान !

UPSC IAS Toppers : शेतकऱ्याचा लेक झाला IAS

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button