परिवर्तन न्यूज- Exclusive

Rahul Gandhi on New Parliament Building : पंतप्रधान हे संसदेच्या उद्घाटनाला राज्याभिषेक समजत आहेत

आज सकाळी दिल्ली येथे नवीन संसद भवनाचे उद्घाटन पार पडलं. यावेळी देशातील विविध साधुसंतांनी याठिकाणी उपस्थिती दर्शवली.

नवीन संसद भवनाचे उद्घाटन हा सध्या देशातील चर्चेचा विषय ठरलेला आहे कारण विरोधकांनी या उद्घाटन सोहळ्यावरती बहिष्कार टाकलेला आहे. विरोधकांचं म्हणणं होत की देशाच्या राष्ट्रपतींच्या हस्ते या नवीन संसदेच उदघाट्न व्हावं.

देशाचे राष्ट्रपती हे सर्वोच्च आहेत ते देशाचे प्रथम नागरिक आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते उदघाट्नाला विरोध राहुल गांधी यांनी प्रथमत दर्शवीला.आज संसद भवनाच्या उदघाटनावेळी देशाचे उपराष्ट्रपती देखील उपस्थित नव्हते.

यावर एकंदरीत राहुल गांधी यांनी ट्विट करत जोरदार टिका केली आहे.

“पंतप्रधान हे संसदेच्या उद्घाटनाला राज्याभिषेक समजत आहेत. संसद ही लोकांची आवाज आहे”

Sharad Pawar on New Parliament Building : मला निमंत्रण नाही, वाचा सविस्तर

पंतप्रधान मोदी यांनी देखील ट्विट केल आहे.

“भारतीय संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनावेळी सेंगोलला मान्यता मिळाल्याचे पाहून आनंद झाला. वारसा आणि प्रगती कशी सुंदरपणे विलीन होते, हे तिची उपस्थिती स्पष्ट करते, ज्यामुळे आम्हाला लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आणखी प्रेरणा मिळते.”

New Sansad Bhavan : खासदारांची आसन क्षमता माहिती आहे का?

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button