परिवर्तन न्यूज- Exclusive

Nitesh Rane on Rahul Gandhi: आता राष्ट्रपतींचा पुळका येतोय? विचारला थेट सवाल

मुंबई : आ.नितेश राणे यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेतली आणी या पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत, राहुल गांधी व उद्धव ठाकरे यांवरती त्यांनी जोरदार टीका केली.

नितेश राणे यांनी नवीन संसद भवनाच्या उद्घाटन समारंभ बाबत काँग्रेसच्या भूमिकेला त्यांनी प्रश्न उपस्थित केला. राहुल गांधी यांना आताच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांची आठवण का येते?

राष्ट्रपतींचा अपमान होतोय म्हणून तुम्ही जनजण पछाडताय. जेव्हा द्रौपदीजींचं नाव राष्ट्रपती पदासाठी जाहीर झाल तेव्हा काँग्रेसन उमेदवार का दिला? असा प्रश्न त्यांनी राहुल गांधी यांना विचारला.

काँग्रेसच्या नेत्याने देशाच्या राष्ट्रपतीचा “राष्ट्रीय पत्नी” अस बोलुन अपमान केला होता, त्या वेळेस काँग्रेसच्या नेत्यांनी त्याचा जाहीर निषेध का केला नाही? तो आजही काँग्रेसमध्ये आहे. राष्ट्रपतींच्या पहिल्या भाषणला देखील तुम्ही बहिष्कार टाकलेलला.

मग नेमक आदिवासी समजाचा अपमान कोण करतय भाजपा की काँग्रेस असा थेट सवाल त्यांनी राहुल गांधी यांना केला.

काँग्रेस लोकशाहीवर कधीपासून विश्वास ठेवायला लागली

बाप चोरला म्हणून आरोप करतात

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button