परिवर्तन न्यूज- Exclusiveमहाराष्ट्रशहर

Mangal Prabhat Lodha : दिवंगत लोकनेते दी. बा. पाटील यांच्या कार्याची माहिती दर्शवणारे संग्रहालय तयार करणार!

पनवेल, २४ जून २०२३ – लोकनेते दी. बा. पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त महात्मा ज्योतिबा फुले सभागृह (आगरी समाज), पनवेल येथे कौशल्य, उद्योजकता, रोजगार आणि नाविन्यता विभागातर्फे ‘पंडित दिनदयाळ उपाध्याय’ रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते’. कौशल्य, रोजगार, उद्योजगता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. कौशल्य, उद्योजकता, रोजगार आणि नाविन्यता विभागातर्फे गेल्या ऑगस्ट महिन्यापासून ७०० पेक्षा जास्त रोजगार मेळाव्यांचे आयोजन केले गेले असून या मध्ये ३० पेक्षा जास्त कंपन्यांनी सहभाग घेतला आहे.

पनवेल येथे झालेल्या सदर मेळाव्यात ९२० युवकांनी उपस्थिती दर्शविली. यापैकी एकूण ३९१ युवकांना नोकरी मिळाली. तसेच येथे एकूण ४५ कंपनी व आस्थापने सहभागी झाले असून एकूण ४००० पेक्षा जास्त रिक्त पदे उपलब्ध होती.

Uddhav Thackeray on PM Care Fund : पीएम चा अर्थ काय? उद्धव ठाकरे बोलले तर त्यांचा नड्डा सुटतो.

पारंपरिक शिक्षणासह तरुणांनी कौशलय शिक्षणावरती सुद्धा भर द्यावा जेणेकरून नोकरी मिळण्यास मदत होते. आपल्या राज्यात येणारे विविध प्रकल्प, बदलते तंत्रज्ञान, या सगळ्याचाच विचार करून तरुणांना कौशलय विकास आणि रोजगाराच्या विविध संधी नेहमीच शासन उपलब्ध करून देत राहील असे मंत्री महोदयांनी या वेळी सांगितले. त्याचबरोबर नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळ सुरु झाल्यावर स्थानिक तरुणांना तिथे रोजगार मिळेल. त्या नोकरीकरीता आवश्यक कौशल्याचा विकास व्हावा यासाठी सुविधा निर्माण करू असे देखील त्यांनी सांगितले.

दिवंगत लोकनेते दी. बा. पाटील यांचे कार्य जगासमोर यावं या उद्देशाने त्यांच्या कामाची माहिती दर्शवणारे संग्रहालय तयार करणार असल्याची घोषणा मंत्री महोदयांनी केली. यासाठी आवश्यक ते सहकार्य आणि आर्थिक तरतूद सरकार तर्फे करण्यात येईल असे आश्वासन मंत्री महोदयांनी दिले.

दर्शना पवार… पोरी चूक तुझीच आहे…

या मेळाव्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, माजी खासदार रामशेठ ठाकूर, दिवंगत लोकनेते दी. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्व पक्षीय कृती समिती चे अध्यक्ष शरद दादा पाटील, तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button