परिवर्तन न्यूज- Exclusive

पुण्यात सट्टेबाजी करणारं रॅकेट उघड, तीन आरोपींना पुणे पोलीसांनी ठोकल्या बेड्या !

पुणे : सध्या आयपीएल क्रिकेट जोमात आहे. प्रत्येकजण आपल्या टीमसाठी प्रयत्न व सपोर्ट करतोय.

इतक्यातच सध्या पुणे मधून एक नवीन बातमी समोर आली आहे. आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा
घेणाऱ्या ३ सट्टेबाजांना पुणे पोलिसांनी अटक केलीय.

या प्रकरणी पुण्यातील एका प्रसिद्ध पबच्या मालकासह बड्या “बुकी” चा समावेश आहे. एवढंच नाही तर आयपीएल सामन्यांवरील सट्टेबाजीचे धागेदोरे मुंबई, नागपूर सह थेट दुबई पर्यंत झाल्याचे उघडकीस आले आहे..

पुण्यातील खंडणी विरोधी पथकाने ही कारवाई केली. पुणे पोलिसांनी कोंढवा भागातील एका इमारतीत सुरू असलेला सट्टेबाजांचा अड्डा उधळून लावला.

पुण्यातील एका प्रसिद्ध पब मालक जितेश मेहता याला देखील ताब्यात घेण्यात आलंय. याशिवाय या सट्टायातील मुख्य बुकी अक्षय तिवारी जो मध्या प्रदेशात वास्तव्यास आहे त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

इंदूरमधील सट्टेबाज अक्षय तिवारी याच्याशी मेहताचे लागेबांधे आहेत हे तपासातून समोर आलंय.बेटिंग चे कनेक्शन थेट टर्की, दुबई सारख्या देशात गेलंय. आत्तापर्यंत या आरोपींकडून मोबाईल, डायरी आणि लॅपटॉप हस्तगत करण्यात आलेलं आहे.

एकीकडे आयपीएल क्रिकेट अंतिम टप्यात आल आहे आणी अश्या बातम्या समोर येत आहे.

New Sansad Bhavan : खासदारांची आसन क्षमता माहिती आहे का?

ठीक 7 वर्षानांनतर पुन्हा नोटबंदी ? 2000 रुपयाची नोट बंद ? वाचा सविस्तर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button