परिवर्तन न्यूज- Exclusive

Padmasinha Patil : धारशिव जिल्ह्याची पाण्याची तहान भागवणार नेतृत्व ! वाचा सविस्तर

धाराशिव जिल्ह्याचे शिल्पकार म्हणून ओळख असलेले डॉ पद्मसिंह पाटील साहेब यांचा आज वाढदिवस आहे. डॉ पद्मसिंह पाटील हे महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री असून त्यांनी ऊर्जा, पाटबंधारे अशी मंत्रीपद भूषवली आहेत. पद्मसिंह पाटील यांचा राजकारणातील प्रवास हा 50 वर्षांहून अधिक आहे.

डॉ पद्मसिंह पाटील यांच्या कार्यकाळातील महत्वाचे निर्णय :

 • कृष्णेचं पाणी धाराशिवला :
  • कृष्णा खोऱ्याचे पाणी धाराशिव जिल्ह्याला मिळावं यासाठी पद्मसिंह पाटलांनी आपली राजकीय कारकीर्द पूर्णपणे पणाला लावली आणि ते कृष्णा खोऱ्यातील हक्काचं पाणी हे धाराशिव जिल्ह्याला मिळालं.
 • उजनीच पाणी थेट धाराशिवमध्ये :
  • धाराशिव जिल्ह्याला शाश्वत पाणीसाठा नसल्यामुळे भविष्यातील गरज ओळखून 21 वर्षापूर्वीच उजनी धरणातून धाराशिवसाठी पद्मसिंह पाटलांनी आरक्षण मंजूर करून ठेवले. 125 किलोमीटरवरील उजनीची गंगा ही थेट धाराशिव जिल्ह्यात पोहोचवल.

Raj Thackeray letter to Narendra Modi : महिला कुस्तीपटूंच्या न्याय्य मागण्यांकडे लक्ष द्यावं

 • सिंचन क्षेत्रात मोठ योगदान :
  • उर्जा व पाटबंधारे मंत्री असताना त्यांनी केलेले काम अत्यंत उल्लेखनीय आहे. 1988 साली जिल्ह्यात तीन हजार 3514 कृषी पंप होते ते 2013 साली 1,38,097 झाले.यातून धाराशिव जिल्ह्यातील अधिकाधिक जमीन सिंचनाखाली गेली.
 • धाराशिव रेल्वेच्या नकाशावर :
  • तब्बल २० किमी वळसा घालून रेल्वेमार्ग उस्मानाबाद शहरा नजीक आणला. प्रचलित मार्ग सोडून एवढा मोठा वळसा घेऊन निर्माण झालेला हा रेल्वेमार्ग देशातील एकमेव उदाहरण आहे.
Padmasinha Patil
धाराशिव रेल्वेच्या नकाशावर
 • ३ लाख रुग्णांवर मोफत औषधोपचार, १२ हजार मोफत शस्त्रक्रिया! :
  • तेरणा जनसेवा केंद्राचं ‘आरोग्यम् धनसंपदा’ अभियान म्हणजे गोरगरिबांच्या आरोग्याची काळजी घेणारे जबाबदार कुटुंबच. ३ लाखाहून अधिक गरजूंची मोफत तपासणी, औषधोपचार आणि १२ हजार रुग्णांवर मोफत यशस्वी शस्त्रक्रिया हे सगळं त्यांनी मोठ्या तळमळीनं घडवून आणल.

New Sansad Bhavan : खासदारांची आसन क्षमता माहिती आहे का?

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button