परिवर्तन न्यूज- Exclusive

सुरक्षिततेला प्राधान्य देवून दहिहंडीचा उत्सव साजरा करावा! मंत्री संजय बनसोडे यांचे आवाहन

मुंबई,६ सप्टेंबर : सरकारने दहिहंडी उत्सवाला साहसी खेळाचा दर्जा दिला असून गुरुवारी मोठ्या उत्साहात राज्यभर दहीहंडीचा उत्सव साजरा केला जाणार आहे. या दहिहंडी उत्सवात सामील होणाऱ्या गोविंदा पथकांची सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, तसेच काटेकोर नियमांचे पालन करुन दहिहंडीचा उत्सव साजरा करावा, असे आवाहन क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी केले.

राजगड येथील राष्ट्रवादी काँग्रेस भनवात ‘जनता संवाद’ हा अभिनव उपक्रम सुरु करण्यात आला. या उपक्रमात उपस्थित राहून सर्वसामान्य जनता, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या समस्या जाणून घेवून घेतल्या. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

गोविंदांना कोणतीही इजा होऊ नये यासाठी काटेकोरपणे नियमावली बनविण्यात आली आहे. त्यात दहिहंडी लावतांना हेल्मेट, शक्य तेथे मॅटचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. गोविंदा पथकांकडून या नियमांचे काटेकोपणे पालन होण्यासाठी गोविंदा समन्वय समिती देखरेख करणार आहे.

यावर्षी शासनाने 75 हजार गोविंदांचा विमा उतरवला आहे. त्यासाठी 56 लाख 25 हजार रुपये विमा कंपनीला भरले आहेत. तसेच अपघाती मृत्यृ झाल्यास, दोन डोळे किंवा अवयव गमावल्यास, कायमस्वरुपी अपंगत्व आल्यास 10 लाख रुपये, एक हात किंवा पाय, डोळा गमावल्यास 5 लाख रुपयांचा विमा सुरक्षा देण्यात येणार असल्याची माहिती क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button