परिवर्तन न्यूज- Exclusive

लोकांनी आपल्यावर ठेवलेल्या विश्वासाला खरे उतरुन पक्ष बळकटीसाठी प्रयत्न करुया ! प्रफुल पटेल

मुंबई, दि. १५ ऑगस्ट –

लोकांनी आपल्यावर ठेवलेल्या विश्वासाला खरे उतरुन पक्षाचे नेते अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आपला पक्ष अधिक बळकट कसा करता येईल यासाठी प्रयत्न करूया, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई येथील प्रदेश कार्यालयात राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पक्षाच्यावतीने त्यांनी सर्व देशवासीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

आपला देश प्रगतीपथावर चालत राहण्यासाठी देशामधील सामान्य शेतकरी, दलित, आदिवासी, कामगार, युवा, महिला अशा सर्व घटकांचा समावेश असावा असे मत प्रफुल पटेल यांनी व्यक्त केले. आपण मिळून राज्याची आणि देशाची उत्तमरीत्या सेवा करूया. लोकांची आपल्या पक्षाकडून असलेली अपेक्षा यशस्वीपणे पूर्ण करण्याचा संकल्प करूया.

आदरणीय शरद पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली १९९९ साली आपल्या पक्षाची स्थापना करताना आपण जो संकल्प केला होता त्याप्रमाणे अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची उन्नती सतत होत राहिली. आजचा दिवस हा देशासोबतच आपल्या पक्षासाठीही शुभ दिवस आहे. राज्याची सेवा करण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. राज्यकर्त्यांना केवळ सत्तेसाठी संधी मिळत नाही तर खऱ्या अर्थाने आपले विचार आणि आचारांनी लोकांच्या सेवेची आणि विकासाची जबाबदारी मिळते, ती जनसेवेत अर्पित करण्याचा प्रयत्न करूया असेही प्रफुल पटेल यांनी स्पष्ट केले. .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button