परिवर्तन न्यूज- Exclusive

महाविकास आघाडीत संभ्रम? पहा काय म्हणाले सुप्रिया सुळे

मुंबई:-

आज दि १६ ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी कार्यालया मध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्व. आर. आर. पाटील (आबा) यांची आज जयंती निमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा खासदार सुप्रियाताई सुळे उपस्थित होत्या. तेव्हा त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. सुप्रिया सुळे म्हणाल्या की आबाने जाऊन इतकी वर्ष झाली मात्र एक दिवस जात नाही की त्याची आठवण येत नाही. अतिशय कल्पक, मेहनती आणि प्रामाणिकपणे कर्तव्याला जागणारा संवेदनशील माणूस म्हणजे आबा. महाराष्ट्राच्या जडणघडणीत त्यांनी दिलेले योगदान अविस्मरणिय आहे.

पक्षाच्या बांधणीमध्ये आबांचे मोठं योगदान आहे. आबांची सर्वसामान्य कार्यकर्त्यांसह ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांची नाळ जुळणारा नेता म्हणून ओळख आहे. हेच कार्य आबांचा मुलगा रोहित पाटील पुढे नेत आहे असे खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले. ते पुढे म्हणाल्या की, आम्ही वैचारिक मतभेद आणि नात्यांमध्ये असलेला ओलावा यात कधीही फरक करत नाही. एन डी पाटील यांच्या पत्नी या पवारांच्या बहिण आहेत मात्र तरीही एनडी पाटील अनेकदा पवारांच्या विरोधातही ते वैचारिक मतभेद होते. मात्र आमच्या नात्यांमधला ओलावा कधीही कमी झाला नाही. त्याच पद्धतीने अजित पवार आणि शरद पवार यांच्यामधील नात्यांमधील ओलावा हा कुठेही कमी झालेला नाही.

मात्र पक्षातील वैचारिक तेवर आम्ही नेहमीच एकमेकांना विरोधात असणार आहे. आमचे विचार आणि दादांचे विचार यात फरक आहे. मात्र त्यात कुटुंबातील नात्यावर कुठलाही परिणाम होणार नाही. दादा आणि पवार साहेबांच्या भेटीमुळे महाविकास आघाडी कुठलेही संभ्रम नाही आज संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेमध्ये वक्तव्य आपण ऐकलं असतं तर कदाचित आपण हा मला प्रश्न विचारला नसता असेही देखील खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button