परिवर्तन न्यूज- Exclusive

भाजप खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्या उपस्थितीत चंद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगसाठी आज अंबा-एकविरा देवीच्या मंदिरात महाआरती

बई २२ ऑगस्ट,
अवघ्या जगाचे लक्ष लागून असलेल्या व देशासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले मिशन चंद्रयान तीनच्या यशस्वी लँडिंगसाठी बुधवार (ता.२३)भारतीय जनता पक्ष शहर जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांमार्फत अमरावतीचे आराध्य दैवत अंबा-एकविरा देवीच्या मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी या महाआरतीला उपस्थित रहावे, असे आवाहन भारतीय जनता पक्षातर्फे करण्यात आले होते. या प्रसंगी राज्यसभेचे खासदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ.अनिल बोंडे यांची महाआरतीच्यावेळी विशेष हजेरी लावली.

मिशन चांद्रयान-3 च्या सॉफ्ट लँडिंगच काऊंटडाऊन सुरु झालं आहे. सगळ्या देशाला उद्या, २३ ऑगस्ट संध्याकाळची प्रतिक्षा आहे. संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चांद्रयान-3 चांद्रभूमीला स्पर्श करेल. चांद्रयान-3 च्या सॉफ्ट लँडिंगसाठी इस्रोने कटेकोर नियोजन करुन सर्व आवश्यक काळजी घेतली आहे. अत्यंत छोट्यात-छोट्या गोष्टीचा बारकाईने अभ्यास करुन त्याचा मोहिमेत समावेश करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button