परिवर्तन न्यूज- Exclusive

जेएनपीए देशांच्या विकासात मोठे योगदान देणारे बंदर! संजय बनसोडे

मुंबई, दि.१५:-जवाहरलाल नेहरू प्राधिकरण हे देशातील सर्वांत जास्त कंटेनर वाहतूकीचे बंदर आहे. राज्याच्या विकासात व देशाच्या जीडीपीमध्ये महत्त्वपुर्ण योगदान देत आहेत. या बंदराची क्षमता व भविष्यातील नियोजनाचा विचार करता टर्मिनल १ व २ चे काम पुर्ण झाल्यास १०० लाख कंटेनरचे प्रतिवर्षी दळनवळन करता येईल. त्यामुळे देशांच्या विकासात मोठे योगदान देणारे जेएनपीए बंदर असेल, असे मत क्रीडा व युवक कल्याण, बंदरे विकास मंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.

मंत्री श्री बनसोडे यांनी उरण येथील जेएनपीएला भेट देऊन जेएनपीए व वाढवण बंदराच्या अनुषंगाने सविस्तर आढावा बैठक घेतली. या बैठकीस जेएनपीएचे उपाध्यक्ष उन्मेष वाघ, बंदरे विकास विभागाचे सहसचिव सिद्धार्थ खरात, जनरल मॅनेजर मनिषा जाधव, मुख्य जनरल व्यवस्थापक जी. वैद्यनाथन, मुख्य जनरल व्यवस्थापक श्री. थॉमस, मुख्य जनरल व्यवस्थापक नितीन बोरगावकर, कॅप्टन बाळासाहेब पवार आणि प्राधिकरणाचे पदाधिकारी उपस्थित होते.

जवाहरलाल नेहरू बंदराची क्षमता व भविष्यातील नियोजन पाहता राज्यातील कृषी, औद्यागीकरणाच्या विकासाला चालणा देणारे ठरणार आहे. विशेषत: जेएनपीए- जालना- वर्धा या ट्रान्सपोर्टमुळे शेतकरी व व्यावसायीकांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. तसेच जेएनपीए हे बंदर लोहमार्ग, महामार्ग आणि विमानतळ यांना जोडले गेल्यामुळे मोठी कनेक्टीव्हीटी निर्माण झाली आहे, असेही मंत्री बनसोडे यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button