परिवर्तन न्यूज- Exclusive

आम्ही भाजपच्या द्वेषाच्या राजकारणाविरोधात उभे आहोत! प्रकाश आंबेडकर

मुंबई –
निवडणुका जवळ येताना पाहून भाजप – आरएसएसचे गुंड समाजाला धार्मिक द्वेष, जातीयवाद आणि असत्य चारत असताना, मी अकोल्यातील एका मुस्लिम व्यक्तीच्या मालकाच्या भोजनालयात दलित, आदिवासी, ओबीसी, मुस्लिम अशा वेगवेगळ्या समूहातील सहकाऱ्यांसोबत चिकन तंदूरी, फिश फ्राय आणि माझ्या आवडत्या मटण बिर्याणीचा आस्वाद घेतला. असं ट्विट करत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी भाजप अन राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला.

देशातील सध्याची राजकीय परिस्थिती बघता देशात भीतीचे वातावरण आहे. भारतासारख्या विविधता असलेल्या देशात द्वेषाचे, भीतीचे वातावरण आहे. मणिपूर जळत असतांना देशातील सरकार ती परिस्थिती नियंत्रणात आणू शकत नाहीये.

अशावेळी आपल्या विशेष, वैविध्यपूर्ण ओळखी मजबूत करण्यासाठी, ज्या नेहमीच आपल्या देशाची ताकद राहिल्या आहेत. हा मी आहे. हे आम्ही आहोत. ही वंचित बहुजन आघाडी आहे. असं म्हणत वंचित बहुजन आघाडी ह्या सर्व द्वेषाच्या आणि भाजपा – आरएसएसच्या धार्मिक द्वेषाविरोधात आम्ही ठामपणे उभे आहोत, असं त्यांनी आपल्या ट्वीट मध्ये म्हटले आहे.

ट्विटची लिंक –

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button