Latest Newsपरिवर्तन न्यूज- Exclusiveमहाराष्ट्रशहर

Uddhav Thackeray on PM Care Fund : पीएम चा अर्थ काय? उद्धव ठाकरे बोलले तर त्यांचा नड्डा सुटतो.

मुंबई येथे आयोजित पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी बैठक या कार्यक्रमातून उद्धव ठाकरे यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे. 1 जुलैला मुंबई महापालिकेवर मोर्चा काढण्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली आहे. त्याच बरोबर पीएम केअर फंडाचीही खिल्ली उडवली आहे. हा पीएम केअर फंड ( PM Care Fund) आहे की हास्य जत्रेतील प्रभाकर मोरे फंड आहे? अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी पीएम केअर फंडाची खिल्ली उडवली आहे. तसेच टाटाने कोव्हिड काळात पीएम केअर फंडाला दीड हजार कोटी दिले होते, ते कुठे गेले?, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

पीएमचा अर्थ काय?

पीएम केअर फंड ( PM Care Fund) चौकशीच्या फेऱ्यात येत नाही. पीएमचा अर्थ काय? हास्यजत्रेतील प्रभाकर मोरे केअर फंड. अगं शालू… माहीत आहे ना तुम्हाला? प्रभाकर मोरे केअर फंड काढून टाका त्याचं नाव. मी पीएमचा अर्थ काय? कशासाठी लोकांनी या फंडाचत पैसे दिले? भाजपच्या दलालांनी, लोकप्रतिनिधींनी महाराष्ट्रात पैसे न देता प्रभाकर मोरे केअर फंडला पैसे दिले. मग ते पैसे गेले कुठे? करोडो रुपये तिकडे गोळा झाले. व्हेंटेलिटेर बिघडलेले होते. हे कुणाचं पाप होतं? कुणी खरेदी केली होती? तुम्ही आमची चौकशी करता मग तुमच्या या घोटाळ्याची कोण चौकशी करणार? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

Sharad Pawar on Bihar Meeting : 2024ची रणनीती ठरणार आहे काय? शरद पवार यांनी स्पष्ट सांगितलं

मग भाजप विरुद्ध मी, त्याचं काय?

छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत लुटली होती. हे वर बसलेले दलाल महाराष्ट्राची राजधानी लुटत आहेत. मुंबई मॉडेलचं जगात कौतुक झालं. पण या नालायकांना त्याचं कौतुक नाही. बराक ओबामा त्यांच्याबद्दल बोलले. आता कुठे गेला माय डिअर बराक…? आता बराक बराच बोलतोय. आता बोललो तर बोलतील हा आंतरराष्ट्रीय जागतिक कट आहे. मला खेचायचा. मोदी विरुद्ध जग, असा कट झाला आहे. मग इकडे उद्धव ठाकरेंविरुद्ध भाजप आहे. त्याचं काय? असा सवाल त्यांनी केला.

त्यांचा नड्डा सुटतो

मी कोणीच नाही. माझ्याकडे पक्ष नाही. चिन्ह नाही. जेपी नड्डा ओरिसात गेले. तिथे माझ्याविरोधात बोलले. उद्धव ठाकरे बोलले तर त्यांचा नड्डा सुटतो. बोलायला सुटतो असं मला म्हणायचं आहे. तुम्हाला काय वाटलं? मी नड्डा हा बोललो आहे. नड्डा सुटतो म्हणजे बोलत सुटतो, असं उद्धव ठाकरे यांनी म्हणताच एकच खसखस पिकली.

“तुमचे ‘नड्डे’ केव्हा सैल होतील, हे…”, कुटुंबाबद्दल केलेल्या विधानानंतर फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना थेट इशारा!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button