Latest Newsमहाराष्ट्रशहरसत्ताकारण

Telangana CM KCR Maharashtra Tour : 600 गाड्यांचा ताफा घेऊन महाराष्ट्रात ! राजकारणावर काय होणार परिणाम? वाचा सविस्तर

तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर (Telangana CM KCR Maharashtra Tour) हे दोन दिवसाच्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत.काल मुख्यमंत्री केसीर तब्बल 600 गाड्यांचा ताफा घेऊन हैदराबाद वरून महाराष्ट्रा कडे रवाना झाले आहेत. काल त्यांचा मुक्काम सोलापूर मध्ये होता. आज त्यांच्या मंत्रिमंडळासोबत पंढरपूर येथील पांडुरंगाचे दर्शन घेणार आहेत.

मागील काही महिन्यांपासून बीआरसी (BRS Party entry in Maharashtra) पक्षाने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. BRS पक्षाची महाराष्ट्रमध्ये एन्ट्री होत असल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे.

BRS च्या महाराष्ट्रात मधील एन्ट्रीने काय परिणाम होतील ते बघूयात (Telangana CM KCR Maharashtra Tour Impact)

1. जनतेसाठी नवा पर्याय तर राजकीय पक्षांसाठी नवा स्पर्धक!
महाराष्ट्रात भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना-ठाकरे गट हे पाच प्रमुख राजकीय पक्ष आहेत. तसंच इतरही काही प्रादेशिक पक्ष सक्रीय आहेत. अशातच BRS च्या एन्ट्रीने जनतेसाठी एक नव्या पक्षाचा पर्याय समोर असेल अन् राजकीय पक्षांसाठी मात्र आणखी एक स्पर्धक…

2. मत विभाजन

आणखी एक पक्ष राज्याच्या राजकारणात सक्रीय झाल्याने याचा परिणाम सहाजिकपणे निवडणुकांवर होणार आहे. निवडणुकांमध्ये मतांचं विभाजन होणार हे निश्चित आहे.

3. दलित मतांवर परिणाम

केसीआर यांनी नांदेडमधून राज्याच्या राजकारणात एन्ट्री केली आहे. BRS कडून करण्यात येणाऱ्या जाहिराती आणि त्यांच्या भाषणातील मुद्दे पाहता BRS च्या एन्ट्रीने राज्यातील दलित मतांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता दाट आहे.

Uddhav Thackeray on PM Care Fund : पीएम चा अर्थ काय? उद्धव ठाकरे बोलले तर त्यांचा नड्डा सुटतो.

4. तरूणाईला संधी

ज्या लोकांना राजकारणात यायचं आहे. नव्या संधीच्या शोधात आहेत. अशा लोकांसाठी विशेषत: तरूणांसाठी राजकारणात एन्ट्री करण्यासाठी मोठी संधी असेल. त्यामुळे तरूण वर्ग या पक्षाकडे आकर्षित होण्याची शक्यता अधिक आहे.

5. नाराज नेत्यांना पुनर्वसनाची संधी

महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता सगळ्याच पक्षात कुणाची ना कुणाची नाराजी पाहायला मिळते. काम करण्याची संधी मिळत नाही, असं म्हणत राज्यात पक्षांतर होत आहेत. अशा या सगळ्याच पक्षातील नाराज नेत्यासाठी ही संधी असेल. त्यामुळे या राजकीय नेत्यांना आपलं राजकीय पुनर्वसन करण्याची मोठी संधी या निमित्ताने मिळणार आहे.

विठुरायाच्या दर्शनासाठी केसीआर महाराष्ट्रात, सोबतीला ६०० गाड्यांचा ताफा! राज्याची राजकीय समीकरणं बदलणार?

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button