Latest News

Sharad Pawar Latest : सुप्रिया सुळे आणी प्रफुल पटेल यांना मोठी जबाबदारी, अजित पवारांना कोणती जबाबदारी मिळणार?

दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज 25 वा वर्धापन दिन आहे.त्यानिमित्त दिल्ली येथील कार्यक्रमातून राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या भाषणातून भाजपा वरती जोरदार टीका केली. भाषण संपताच पवारांनी एक कागद काढून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या कार्यकारी अध्यक्षांची घोषणा केली.

तसं पाहता हा शरद पवारांचा मास्टरस्ट्रोक म्हणावा लागेल. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल व राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी नेमणूक केली व तसेच इतर नेत्यांची देखील राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या पदावर नियुक्ती केली.

शेवटी पवारांनी दिल्लीतून भाकरी फिरवली असच म्हणावं लागेल. अलीकडच्या काळात पवारांनी राजीनामा देऊन जणू सर्व कार्यकर्त्यांना धक्का दिला होता पण तो निर्णय त्यांनी मागे घेतला. सध्या वाटत होत की राष्ट्रवादीमध्ये सर्व काही आलबेल सुरू आहे आणि आजचा हा निर्णयामुळे नवीन तर्कवितर्कांना जोर येत आहे.

कारण आज शरद पवारांनी नियुक्ती जाहीर करताना अजित पवारांचा कुठेही उल्लेख करण्यात आला नाही. त्यामुळे कदाचित अजित पवार यांना कोणती जबाबदारी मिळणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेला आहे.

सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून दिलेला जबाबदारी बद्दल पक्षाचं आणि सर्व कार्यकर्त्यांचे आभार देखील मानलेत. तसेच अजितदादांनी देखील ट्विट करून नवीन कार्यक्रारी अध्यक्ष यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

कुणाकडे काय जबाबदारी?

सुप्रिया सुळे – कार्यकारी अध्यक्ष, महाराष्ट्र, हरियाणा, पंजाब राज्यांची जबाबदारी, महिला आणि युवा विंगची जबाबदारी, तसेच लोकसभेतील समन्वयाची जबाबदारी

प्रफुल्ल पटेल – कार्यकारी अध्यक्ष, मध्यप्रदेश, राजस्थान, गोवा राज्याची जबाबदारी

सुनील तटकरे – राष्ट्रीय महासचिव, ओडिशा, पश्चिम बंगालची जबाबदारी, शेतकरी आणि अल्पसंख्यांक विभागाचे प्रभारी

नंदा शास्त्री – दिल्लीच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त

फैसल – तामिळनाडू, तेलंगना, केरळ राज्यांची जबाबदारी

Sharad Pawar Threat Case : शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी, “तुझा लवकरच दाभोळकर होणार” वाचा सविस्तर

Sharad Pawar Big Announcement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button