Latest News

50 कुठं 105 कुठं? हा आमच्या भाजपाचा मोठेपणा ! शिवसेना व भाजपामध्ये बॅनर्सवार?

उल्हासनगर : भाजपा आणि शिवसेना युती मध्ये गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या घडामोडींमुळे कुठे तरी वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत. भाजपाने शिंदे गटातील मतदारसंघांमध्ये हस्तक्षेप करायला सुरु केल्याने शिंदेगटात देखील खळबळ उडालेली आहे.

त्यानंतर श्रीकांत शिंदे यांनी युती टिकावी म्हणून खासदारकीचा राजीनामा देण्याची भाषा केली आहे. त्याखालोखाल भाजपाने कल्याण-डोंबिवली आणि ठाणे लोकसभा मतदार संघ हा आमचाच आहे असा दावा टोकल्यामुळे नविन चर्चांना उधाण आल आहे.

नुकताच शिंदे गटाने बॅनर लावून भाजपला डिवचले असता काल भाजपने बॅनर लावून शिंदे गटाला उत्तर दिल आहे. त्यामुळे दोघातील वाद विकोपाला गेल्याचे दिसून येत आहे.

50 कुठं 105 कुठं? हा आमच्या भाजपाचा मोठेपणा ! देवेंद्र फडवणीस साहेब नाम ही काफी है ! असा मजकूर लिहिलेले बॅनर्स उल्हासनगरात लावण्यात आहे. त्यावरती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचा फोटो आहे. त्याखाली किंग मेकर असं लिहिलं आणी.

Sanjay Raut on Eknath Shinde : जाहिरातीत बाळासाहेबांचा फोटो नाही? ये पब्लिक है…सब जानती है

याच बॅनर्स वरती पंतप्रधान नरेंद्र मोदी, जेपी नड्डा आणि अमित शहा यांच्यासह पंकजा मुंडे तसेच रवींद्र चव्हाण यांचा फोटो आहे.

दरम्यान उल्हासनगर मध्ये काल ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख अरुण आशान यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या समर्थनार्थ बॅनर लावत भाजपाला डिवचलं होतं “कमजोर लोग ही शिकवा और शिकायत करते हे महान लोग तो हमेशा कर्म की वकालत करते है, माझा नेता माझा अभिमान” अशा आशयाचे बॅनर उल्हासनगर कॅम्प चार मध्ये लावण्यात आले होते.

बॅनर्स वार आणि शिवसेनेने दिलेली जाहिरात यामुळे सध्या भाजप आणि शिवसेना युतीतील वातावरणात तणाव निर्माण झाल आहे.

तलाठी भरती २०२३ : महाराष्ट्र महसूल व वन विभाग तलाठी फॉर्म !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button