Latest Newsमहाराष्ट्रशहर

Monsoon Update : कोकणसाठी ऑरेंज अलर्ट! या भागात मुसळधार पाऊस, पावासाचा जोर वाढला.

Monsoon Update Maharashtra : बिपरजॉय चक्रीवादळामुळे (Biparjoy Cyclone) महाराष्ट्रात यावर्षी मान्सूनला यायला उशीर झाला. पण मागील दोन दिवसापासून मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात सक्रिय झाला आहे. यामुळे चिंतेत असलेला शेतकरी वर्ग आता आनंदित होत आहे. सध्या मागील दोन दिवसांमध्ये मुंबई,पुणे या ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे.

काल महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढला असून नाशिक, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यात आज अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. तसेच अनेक जिल्ह्यांमध्ये सर्वदूर पाऊस येण्याची शक्यता वर्तवण्यात आली काल.

पुढील दोन दिवस कोकणासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दोन दिवसापासून नागपूरच्या काही भागात मुसळधार पाऊस होत आहेत. आता सर्वत्र ढगाळ वातावरण आहे, सध्याचा पाऊस हा शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा ठरला आहे.

कोकणासाठी पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट (Kokan Monsoon Update)

कोकणात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू झाला काल. पुढचे दोन दिवस हवामान खात्याकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

काल रात्रीपासून रत्नागिरी जिल्ह्यात देखील पावसाचा जोर वाढला आहे. त्याचबरोबर किनारपट्टी भागात पुढचे दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

उन्हापासून नागरिकांना दिलासा

मागील दोन दिवसापासून सक्रिय झालेल्या पावसामुळे महाराष्ट्रातील वातावरणामध्ये तापमानाच प्रमाण कमी झाला आहे. यामुळे नागरिकांना देखील उन्हापासून होणाऱ्या त्रासापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. काल नगर, शिरूर या भागात देखील चांगला पाऊस झाला.

या आलेल्या पावसामुळे शेतकरी पेरणीचे काम सुरू करत आहेत. मुंबई मध्ये देखील पावसाचे आगमन झाल्यानंतर गेल्या दोन दिवसापासून सर्व ठिकाणी पाऊस पडत आहे.

हवामान खात्याने मुंबईसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. तसेच मुंबई मध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे मुंबईच्या काही सखल भागात पाणी साचत असल्यामुळे तिथे पर्याय व्यवस्था ठेवण्यात आली आहे. कल्याण-डोंबिवलीत सलग दुसऱ्या दिवशी पावसाची संततधार सुरू आहे.

Uddhav Thackeray on PM Care Fund : पीएम चा अर्थ काय? उद्धव ठाकरे बोलले तर त्यांचा नड्डा सुटतो.

अजित पवारांना पक्षसंघटनेत जबाबदारी मिळणार का? शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button