Latest News

Manisha Kayande News : मनीषा कायंदे करणार शिवसेनेत प्रवेश…उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ! Breaking

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाच्या फायर ब्रँड नेत्या विधानपरिषद आ. मनीषा कायंदे आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मनीषा कायंदे सध्या नॉट रिचेबल आहेत. हा ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जातोय.

काही दिवसांपासून मनीषा कायंदे नाराज असल्याची चर्चा सुरु होती. आज ठाकरे गटाचे 3 माजी नगरसेवक देखील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

मनीषा कायंदे या मुळच्या शिक्षका होत्या. नंतर त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश करून राजकारणाला सुरुवात केली. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर विश्वास ठेऊन विधानपरिषदच तिकिट दिल होत, ज्याला शिवसेनिकांचं विरोध होता.

संजय राऊत यांची प्रतिक्रिया

मनिषा कायंदे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. यावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा कचरा इकडे तिकडे उडत असतो. हवेचा झोका बदलला की तो कचरा पुन्हा आमच्या दारात येऊन पडतो, असं संजय राऊत म्हणालेत.

Monsoon Update : महाराष्ट्रात मान्सून कधी येणार? उशीर का होतोय? जाणून घ्या

शिशिर शिंदे देखील करणार शिवसेनेत प्रवेश!

ठाकरे गटाचं उपनेतेपद शिशिर शिंदे यांच्याकडे होतं. या उपनेतेपदाचा राजीनामा शिशिर शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे काल सुपूर्द केला आहे. शिशिर शिंदे देखील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button