Latest News

Cheque Bounce Rules : खबरदार ! चेक बाउन्स कराल तर जाव लागेल तुरुंगात, वाचा सविस्तर

चेक बाउन्स नियम सर्वानी जाणून घेणे आवश्यक आहे कारण Cheque चा वापर हा विविध व्यवहारांसाठी केला जातो ज्यात मोठी रक्कम देणे, कर्जाची परतफेड करणे, वीज भरणे, पगार देणे, मोठ्या रकमेचा धनादेश देणे असे अनेक व्यवहार यात येतात.

चेक बँकमध्ये जमा केले की बँक त्याची शहानिशा करून सेटल करते. चेक वापरून पेमेंट करणे हा सुरक्षित मार्ग आहे असा लोकांचा विश्वास आहे. ऑनलाईनच्या जगात देखील आज अनेक व्यवहार चेक मधून होतात. Cheque Bounce झाला, तर मग पुढे काय? जाणून घेऊया सविस्तर

चेक बाऊन्स म्हणजे काय ?

जर तुम्हाला कोणी चेक दिला असेल आणि त्या खात्यात पुरेसे पैसे नसतील तर अशा परिस्थितीत चेक बाऊन्स होतो. याशिवाय, जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला 1 लाखांचा धनादेश दिला असेल आणि चेक बँकेत जमा केल्यानंतरही पैसे त्याच्या खात्यात पोहोचले नाहीत, तर अशा परिस्थितीतही चेक बाऊन्स होऊ शकतो.

चेक बाऊन्स झाल्यावर काय नियम आहे ?

जर चेक बाऊन्स झाला, चेक देणाऱ्या व्यक्तीला एका महिन्याच्या आत चेकचे पैसे दिले नाहीत, तर त्याच्या नावावर कायदेशीर नोटीस जारी केली जाऊ शकते.

नोटीस दिल्यानंतर १५ दिवसांनंतरही ती व्यक्ती उत्तर देत नसेल, तर अशा व्यक्तीविरुद्ध निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ऍक्ट 1881 च्या कलम 138 अंतर्गत गुन्हा दाखल केला जाऊ शकतो.

चेक बाऊन्स बद्दलचे नियम :

सध्या डिजिटल पेमेंटचा ट्रेंड खूप वाढला आहे. आता लोक रोखीने नव्हे तर गुगल पे, फोन पे तसेच चेकने व्यवहार करत आहेत.

जेव्हा एखाद्या व्यक्तीला मोठी रक्कम भरावी लागते, तेव्हा सर्वात सुरक्षित चेक पेमेंट मानले जाते, कारण त्यात जास्त ताण येत नाही.

चेक बँकेत जमा केला आणि ३-४ दिवसांनी चेक क्लिअर होतो.

पण चेकमध्ये नक्कीच समस्या आहे. दिलेला चेक बाऊन्स झाला तर दोघेही अडचणीत येऊ शकतात. (rules for cheque bounce)

चेक बाऊन्स झाल्यास काय होईल ?

चेक बाऊन्स झाल्यास चेक देणाऱ्या व्यक्तीवर दंडही आकारला जाऊ शकतो. हा दंड बँकेकडून आकारला जातो. चेक बाऊन्स झाल्यास दोन वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो. दोनपेक्षा जास्त वेळा चेक बाऊन्स झाल्यास बँक खातेही बंद करू शकते.

ठीक 7 वर्षानांनतर पुन्हा नोटबंदी ? 2000 रुपयाची नोट बंद ? वाचा सविस्तर

चेक क्लिअर न होण्याची इतर कारणे :

चेक बाऊन्स झाल्यामुळेच नाही तर इतर अनेक कारणांमुळे चेक क्लिअर होत नाही.

जसे-चेक देणाऱ्या व्यक्तीच्या खात्यात पुरेसे पैसे नाहीत.

बँक खात्यातील स्वाक्षरी आणि धनादेश सारखा नसला तरी चेक क्लिअर होत नाही.

शब्द आणि आकड्यांच्या प्रमाणात तफावत असल्यास चेक क्लिअर होत नाही.

धनादेशाचा काही ठिकाणी फेरफार झाला तरी तो क्लिअर होत नाही.

चुकीचे नाव आणि पद्धत आणि चेकवर ओव्हरराईट केल्यामुळे चेक क्लिअर होत नाही.

IPL 2023 Orange Cap : सलग 3 शतक ठोकत ऑरेंज कॅप आता Shubham Gill कडे.

निश्चितच या माहितीचा आपल्याला फायदा होईल. या पुढे चेकने करणारे व्यवहार आपण सर्वांनी काळजीपूर्वक करावे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button